Siddhi News: व्हीआयपी कंपनी— बॅग आणि सूटकेसच्या दुनियेत भारतातलं एक प्रतिष्ठित नाव. “कल भी, आज भी” ही टॅगलाइन असलेली ही कंपनी आजही हजारो ग्राहकांच्या मनात आपलं स्थान टिकवून आहे. मात्र आता ही कंपनी एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभी आहे.
व्हीआयपी कंपनीचे मालक कोण? आणि निर्णय का?
व्हीआयपी कंपनीचे संस्थापक आणि प्रमुख दिलीप पिरामल, सध्या वयाच्या 75व्या वर्षी आहेत. त्यांनी जाहीर केलं आहे की, कंपनीतील त्यांची 32% हिस्सेदारी (जिची अंदाजे किंमत 1763 कोटी रुपये आहे) विक्रीसाठी उपलब्ध आहे.
यामागचं मुख्य कारण म्हणजे – कुटुंबातील पुढची पिढी ही कंपनी चालवायला इच्छुक नाही.
पिरामल यांच्या मते, “व्यवसाय टिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी एखाद्या नव्या नेतृत्वाची गरज आहे.”
मागणी घट, स्पर्धा वाढ
व्हीआयपी कंपनीने एक काळ गाजवला. पण आजच्या घडीला बाजारात American Tourister, Safari, Skybags यांसारख्या ब्रँड्सची प्रचंड स्पर्धा आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडीत झालेले बदल, डिजाईन, टिकाऊपणा, आणि ट्रेंड्स यामध्ये VIP मागे पडल्याचं चित्र आहे.
अंबानी कुटुंबाशी नातं
दिलीप पिरामल हे प्रसिद्ध उद्योगपती अजय पिरामल यांचे थोरले भाऊ आहेत. अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याचा विवाह ईशा अंबानी हिच्याशी झाला आहे. त्यामुळे दिलीप पिरामल हे अप्रत्यक्षपणे अंबानी कुटुंबाचे व्याही ठरतात.
व्हीआयपी कंपनीचं भवितव्य कोणाकडे?
VIP इंडस्ट्रीज ही सुमारे 6800 कोटी रुपयांच्या मार्केट व्हॅल्यु असलेली कंपनी आहे. तिचं पुढचं पाऊल काय असेल? कोण ती पुढे चालवेल? ती कॉर्पोरेट हाती जाईल की एखाद्या बहुराष्ट्रीय समूहाकडे? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
प्रतिष्ठित ब्रँड नव्या हाती?
VIP ही केवळ बॅग कंपनी नाही, ती एक भावनिक ब्रँड आहे. भारतीय प्रवाशांच्या आठवणीत असलेली, विश्वासाने उभारलेली कंपनी आता नवीन युगात कोण पुढे नेईल, हे पाहणं गरजेचं आहे. पिरामल यांनी दिलेला मोकळा मार्ग म्हणजे संधी, पण त्याला उपयोग कोण करतो, हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं ठरेल.
वाचा: राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती? राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका
तुमचं मत काय? VIP सारख्या ब्रँडचा वारसा टिकवण्यासाठी नव्या पिढीला पुढे यायला हवं का? तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नोंदवा!
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!