BMC निवडणूक 2025साठी भाजपने 27 सदस्यांची स्टीयरिंग कमिटी तयार केली असून, मुंबईत वॉर्डनिहाय आढावा मोहिमेला गती मिळाली आहे.
BMC निवडणूक 2025 : भाजपचा रणसंग्राम सुरू, 27 जणांची स्टीयरिंग कमिटी मैदानात
Siddhi News :मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. पक्षाकडून निवडणूक तयारीसाठी वॉर्ड पातळीवर आढावा मोहीम सुरू करण्यात आली असून, यासाठी 27 सदस्यांची विशेष स्टीयरिंग कमिटी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपची रणनिती ठरली, वॉर्डनिहाय आढावा सुरू
भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आ. आशीष शेलार यांनी जाहीर केलेल्या योजनेनुसार, मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये भाजपकडून परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला जाणार आहे. यासाठी जिल्हानिहाय जबाबदारी नेत्यांना देण्यात आली असून, 7 जुलै 2025 पर्यंत सर्व अहवाल पक्ष कार्यालयात सादर करायचे आहेत.
कोणत्या भागाची जबाबदारी कोणाकडे?
विभाग जबाबदार नेते
उत्तर मुंबई आ. अतुल भातखळकर, आ. योगेश सागर
उत्तर पश्चिम मुंबई आ. अमित साटम, आ. विद्या ठाकूर
उत्तर पूर्व मुंबई आ. मिहिर कोटेचा, माजी खासदार मनोज कोटक
उत्तर मध्य मुंबई आ. पराग अलवणी, संजय उपाध्याय
दक्षिण मध्य मुंबई आ. प्रसाद लाड, माजी आमदार सुनील राणे
दक्षिण मुंबई मंत्री मंगलप्रभात लोढा, अध्यक्ष राहुल नार्वेकर
स्टीयरिंग कमिटीमध्ये अनुभवी आणि तरुण नेतृत्वाचा समावेश
BMC निवडणूक 2025 साठी जाहीर झालेल्या 27 सदस्यांच्या स्टीयरिंग कमिटीमध्ये वर्तमान आणि माजी आमदार, माजी नगरसेवक, तसेच भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्च्याचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती प्रचार, नियोजन, प्रचारसामग्री, आणि कार्यकर्त्यांचे समन्वय यावर लक्ष ठेवणार आहे.
भाजपचा स्पष्ट संदेश : BMC जिंकायचंच!
पक्षाकडून देण्यात आलेल्या संकेतांनुसार, यंदाच्या BMC निवडणुकीत भाजप सर्व स्तरांवर काटेकोर आणि ठोस रणनीतीनुसार लढणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर मजबूत संघटनात्मक बांधणी केली जात असून, निवडणुकीपूर्वी पक्षाचे संपूर्ण लक्ष वॉर्डनिहाय जनसंपर्कावर राहणार आहे.
BMC निवडणूक 2025 साठी भाजपकडून सुरू झालेली ही तयारी पाहता, मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा चुरस निर्माण होणार हे निश्चित आहे. आगामी काळात या आढावा मोहिमेचा परिणाम निवडणुकीवर कितपत होतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे हि वाचा : हिंदी पूर्णतः नाकारणं योग्य नाही, शरद पवारांचा भाषावादावर ठाम पवित्रा