Site icon

अकरावी प्रवेश 2025 प्रक्रिया सुरु; शंका सोडवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल

अकरावी प्रवेश 2025 प्रक्रिया

अकरावी प्रवेश 2025 प्रक्रिया साठी यंदा राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आजपासून ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक आता अकरावी प्रवेशाकडे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षापर्यंत ही प्रक्रिया केवळ महानगरांतच चालू होती, पण यंदा ती संपूर्ण राज्यात राबवली जात आहे. तरीही, या प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश करण्यात आलेला नाही

विद्यार्थी आणि पालकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खास व्हॉट्सअ‍ॅप चॅनल सुरू करण्यात आला आहे. या चॅनलवर तुमच्या सर्व शंका दूर होतील.

नवीन वेळापत्रक आणि प्रवेशाची सध्याची परिस्थिती

अकरावी प्रवेश 2025 प्रक्रिया साठीचे नवीन वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. सुरुवातीला २१ तारखेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती, पण पहिल्या दिवशी वेबसाईट क्रॅश झाली होती. ‘साईट अंडर मेंटेनन्स’ असा संदेश येत होता, त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांना त्रास सहन करावा लागला. दिवसभर अशा गोंधळामुळे चिंता वाढली होती. आता प्रशासनाने वेळापत्रक सुधारित केले असून, आज नव्या तारखा जाहीर होतील. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता त्या दिशेने लागले आहे.

प्रवेशाची क्षमता आणि महत्त्वाच्या सूचना

राज्यात अकरावी प्रवेश 2025 प्रक्रिया साठी एकूण क्षमता सुमारे २० लाख ४३ हजार २५४ जागांची आहे. यात विज्ञान शाखेतील ८ लाख ५२ हजार २०६ जागा सर्वाधिक आहेत. प्रवेश नोंदणी केल्यानंतर विद्यार्थी किमान एक ते कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालये पसंतीनुसार निवडू शकतील.

तसेच, व्यवस्थापन, इन-हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत प्रवेशासाठी प्रत्येक फेरीपूर्वी “Consent” म्हणजेच संमती आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील विभागनिहाय व शाखेनुसार अकरावीची प्रवेश क्षमता – FYJC 2025

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील इयत्ता अकरावी (FYJC) वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण २०,४३,२५४ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन मुख्य शाखांचा समावेश आहे. खाली विभागनिहाय आणि शाखानिहाय जागांची माहिती दिली आहे:

मुंबई विभाग
एकूण जागा: ४,६१,६४०

विज्ञान: १,६०,७१५

वाणिज्य: २,७२,९३०

कला: २२,९५५

पुणे विभाग
एकूण जागा: ३,७५,८४६

विज्ञान: १,७०,१७०

वाणिज्य: १,०१,९७१

कला: १,०३,७०५

छत्रपती संभाजीनगर विभाग
एकूण जागा: २,६६,७५०

विज्ञान: १,१२,६७०

वाणिज्य: ४२,६१५

कला: १,११,१६५

नागपूर विभाग
एकूण जागा: २,१४,३९५

विज्ञान: ९९,८७०

वाणिज्य: ३८,८३०

कला: ७६,३९५

नाशिक विभाग
एकूण जागा: २,०७,३२०

विज्ञान: ८६,७३०

वाणिज्य: ३७,०२०

कला: ८३,०००

कोल्हापूर विभाग
एकूण जागा: १,९३,२७८

विज्ञान: ८०,२४०

वाणिज्य: ४८,४६६

कला: ६४,५७२

अमरावती विभाग
एकूण जागा: १,८६,४७५

विज्ञान: ८१,३९५

वाणिज्य: २४,३४०

कला: ८०,७४०

लातूर विभाग
एकूण जागा: १,३७,५५०

विज्ञान: ६३,४३०

वाणिज्य: २१,२६०

कला: ५२,८६०

एकूण राज्यस्तरीय प्रवेश क्षमतेचा आढावा
एकूण जागा: २०,४३,२५४

विज्ञान शाखा: ८,५२,२०६

वाणिज्य शाखा: ५,४०,३१२

कला शाखा: ६,५०,६८२

 

महत्त्वाचे मुद्दे – FYJC प्रवेश प्रक्रिया

ज्या विद्यार्थ्यांनी CAP (केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया) किंवा कोटामार्फत प्रवेश निश्चित केला आहे, त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले जाणार आहे.

एकदा जर विद्यार्थ्याने निवडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला, तर तो प्रवेश अंतिम मानला जाईल.

प्रवेशासाठी लागणारे नोंदणी शुल्क फक्त डिजिटल पद्धतीनेच स्वीकारले जाईल. रोखीने फी स्वीकारली जाणार नाही.

सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रवेश वेळापत्रकाचं काटेकोर पालन करावं, म्हणजे कोणतीही संधी गमावली जाणार नाही.

व्यवस्थापन कोटा, इन-हाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया ६ जून २०२५ पासून सुरू होणार आहे.

अकरावी प्रवेश 2025 प्रक्रिया बाबत अधिक माहिती हवी असल्यास, अधिकृत संकेतस्थळ www.mahafyjcadmissions.in किंवा ईमेलद्वारे support@mahafyjcadmissions.in वर संपर्क साधावा, असे शिक्षण विभागाचं आवाहन आहे.

अकरावी प्रवेश 2025 प्रक्रिया साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे! आता तुमच्या अकरावी प्रवेशाशी संबंधित सर्व अपडेट्स, सूचना, वेळापत्रक आणि मार्गदर्शन थेट व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहे.

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्या वतीने हा अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल सुरू करण्यात आला आहे.

पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्याची आणि पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सोमवार, २६ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे.

सर्व विद्यार्थी आणि पालकांनी खालील अधिकृत चॅनलवर जाऊन लगेच जॉइन करावं:

अधिकृत WhatsApp चॅनल लिंक

या चॅनलवरून तुम्हाला वेळोवेळी अकरावी प्रवेश 2025 प्रक्रिया संबंधित महत्त्वाच्या सूचना, शंका निरसन आणि इतर सर्व अपडेट्स मिळत राहतील.

Exit mobile version