Siddhi News:बीड जिल्ह्यातील गाजलेल्या जूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख यांनी थेट प्रशासनालाच इशारा दिला आहे. “कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, अन्यथा मी स्वतः कठोर निर्णय घेईल,” असा थेट इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
धमक, दबाव आणि इशारा — कृष्णा आंधळे अजूनही फरार, देशमुखांचा आक्रमक पवित्रा
“कसली न्यायव्यवस्था आणि कसले कायदे, जेव्हा आरोपीच्याच पक्षाला पाठिंबा मिळतो!”
हे शब्द आहेत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे, जे सध्या भयंकर संतापलेले दिसत आहेत.
204 दिवसांपासून फरार आरोपी – न्यायालय आणि प्रशासनाचा दुजाभाव?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे तब्बल 204 दिवसांपासून फरार आहे. देशमुख कुटुंब वारंवार अटक करण्याची मागणी करत असूनही, पोलिस यंत्रणा अपयशी ठरत आहे.
धनंजय देशमुख म्हणाले, “बाकी सर्व आरोपी तुरुंगात असताना, आंधळेला वेगळी वागणूक का दिली जाते?”
ते पुढे म्हणाले की, “आमच्या कुटुंबाच्या जिवाला धोका आहे आणि न्यायालयात देखील आरोपींचे समर्थक, पक्ष चिन्ह असलेल्या गाड्यांनी येत वातावरणात दहशत निर्माण केली जाते.”
कोर्ट परिसरात दबावाचं वातावरण?
बीड न्यायालयात सुनावणीच्या दिवशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि आरोपींचे समर्थक मोठ्या प्रमाणात हजर राहत असल्याचे देशमुख यांनी निदर्शनास आणलं. पक्षाच्या चिन्हांसह गाड्या न्यायालयात आणून कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आरोपींना VIP ट्रीटमेंट? वेगवेगळ्या कारागृहात पाठवण्याची मागणी
धनंजय देशमुख यांनी जेल प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे, यामुळे त्यांना वेगवेगळ्या कारागृहात ठेवावं,” अशी मागणी त्यांनी केली.
परंतु त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही.
मी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
धनंजय देशमुख यांनी दिलेला इशारा आता गांभीर्याने घेतला जात आहे.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,
“जर कृष्णा आंधळेला लवकर अटक झाली नाही, तर मी स्वतः एक कठोर निर्णय घेईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.”
धनंजय देशमुख यांनी उचललेला आक्रमक पवित्रा केवळ त्यांच्या वैयक्तिक संतापाचे नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिलेला इशारा आहे.
प्रशासनाने आता तात्काळ कृती करावी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
हे हि वाचा – रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष घोषित
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!