Siddhi News: भारतामध्ये मोबाइल वापरकर्त्यांसाठी लवकरच महागाईची चिंता वाढणार आहे. मोठ्या दूरसंचार कंपन्या 2025 च्या अखेरीस मोबाइल रिचार्ज प्लॅन्समध्ये 10 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे अनेक वापरकर्त्यांच्या खिशावर ताण येण्याची शक्यता आहे.
Mobile Recharge Plans: ७.४ दशलक्ष नवीन सक्रिय मोबाइल वापरकर्ते
मागील मे महिन्यात भारतात तब्बल ७.४ दशलक्ष नवीन सक्रिय मोबाइल वापरकर्ते जोडले गेले आहेत, ज्यामुळे देशातील एकूण सक्रिय मोबाइल वापरकर्त्यांची संख्या १०८ कोटींवर पोहोचली आहे. यामध्ये रिलायन्स जिओने ५.५ दशलक्ष आणि एअरटेलने १.३ दशलक्ष नवीन ग्राहक वाढवले आहेत. BNP Paribas च्या अहवालानुसार, नवीन ग्राहकांची वाढ 5G सेवांच्या गुणवत्तेवर अवलंबून असेल. २०२७ पर्यंत दूरसंचार क्षेत्राच्या कमाईत द्विशेर्षक वाढ होण्याचा अंदाज आहे.
Mobile Recharge Plans: ही वाढ फक्त बेस प्लॅन्सपुरती मर्यादित नाही, मध्यम आणि प्रीमियम प्लॅन्सवरही फरक जाणवणार आहे.
पूर्वी जुलै २०२४ मध्ये बेस प्लॅन्समध्ये ११-२३% वाढ झाली होती, मात्र यावेळी कंपन्या केवळ बेस प्लॅन्सवरच नाही तर मध्यम आणि उच्च किमतीच्या प्लॅन्सवरही दरवाढ करण्याचा मानस ठेवत आहेत. यामुळे कंपन्यांना महसूल वाढवता येईल आणि ग्राहकसंख्या कमी न करता वाढीचा फायदा होईल. ‘वन-साईज-फिट्स-ऑल’ मॉडेलही यावेळी संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
Mobile Recharge Plans: डेटा वापरावर आधारित विविध किंमती लागू शकतात
तज्ञांच्या मते, ग्राहकांच्या डेटा वापरावर आधारित वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध होऊ शकतात. उदाहरणार्थ, कमी डेटा वापरणाऱ्यांसाठी आणि रात्री उशिरा वापर करणाऱ्यांसाठी वेगळ्या दरांवर योजना असू शकते. त्यामुळे ग्राहक आपल्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडू शकतील.
मोबाईल रिचार्ज प्लॅन्समधील ही वाढ ग्राहकांसाठी काहीशी आव्हानात्मक ठरू शकते, परंतु दर्जेदार सेवा आणि वेगवेगळ्या गरजांनुसार प्लॅन्स मिळाल्यामुळे काही प्रमाणात तोटा कमी होईल. वापरकर्त्यांनी त्यांच्या वापराचा आढावा घेऊन योग्य प्लॅन निवडणे गरजेचे आहे.
हे हि वाचा- Hallmarking Gold का खरेदी करावे? जाणून घ्या 10 फायदे
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!