Site icon

Operataion Sindoor: ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर मुंबईत तिरंगा रॅली; लष्कराच्या शौर्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा सलाम.

Official portrait photo of Chief Minister Devendra Fadnavis

Official photo of Chief Minister Devendra Fadnavis (for article on Operation Sindoor)

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर (Operataion Sindoor) मुळे दहशतवाद्यांचा बीमोड; शहीद तुकाराम ओंबळेंच्या स्मारकावर अभिवादन.

मुंबई | प्रतिनिधी: पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर त्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी लष्कराच्या धाडसी कामगिरीस सलाम करताना, “दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणारे हे मिशन संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे,” असे सांगितले.

रॅलीची सुरुवात स्मृतीस्तंभापासून, समारोप गिरगाव चौपाटीवर

ऑगस्ट क्रांती मैदान येथून रॅलीची सुरुवात झाली. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि इतर मान्यवरांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

रॅली गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यापर्यंत गेली. समारोपावेळी मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करत त्यांच्या बलिदानाला मानवंदना दिली.

Operataion Sindoor “ऑपरेशन सिंदूर”मुळे भारताचं लष्करी सामर्थ्य जगासमोर

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जगाला दाखवून दिलं की, आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत आहे. पाकिस्तानलाही याचा स्पष्ट संदेश मिळाला आहे.”

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “भारताने पहलगाम हल्ल्याचं थेट उत्तर या ऑपरेशनद्वारे दिलं असून, देश कधीही झुकणार नाही.”

या रॅलीमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, तसेच मुंबईतील आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तिरंगा फडकावत, भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

Operataion Sindoor “ऑपरेशन सिंदूर”च्या यशामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईतील तिरंगा रॅलीमुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक तीव्र झाली असून, लष्कराच्या शौर्याला संपूर्ण शहराने मानाचा मुजरा केला.

Exit mobile version