पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणावर भारतीय जवानांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नंतर देशात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युरोपीय दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपीय देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय चर्चा आणि बैठकांमध्ये सहभागी होणार होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड्स या तीन देशांचा दौरा सध्यासाठी रद्द करण्यात आला आहे.
भारतीय जवानांनी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणावर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी तीन देशांचा दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदी ३ युरोपीय देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय चर्चा आणि बैठकांमध्ये सहभागी होणार होते.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नंतर नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड्स या तीन देशांचा दौरा सध्यासाठी रद्द करण्यात आला आहे. मोदी १३ ते १७ मे दरम्यान क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँड्सचा दौरा करणार होते. पंतप्रधान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नॉर्डिक समिटला जात होते.