Site icon

संजय राऊत म्हणतात: शिरसाट संत आहेत का…? सत्य बाहेर यावं!

संजय राऊत म्हणतात: शिरसाट संत आहेत का...? सत्य बाहेर यावं!

संजय राऊत म्हणतात: शिरसाट संत आहेत का...? सत्य बाहेर यावं!

Siddhi News: एक मंत्री जर पैशांच्या बॅगांमध्ये बसलेला दिसतो, तर प्रश्न केवळ व्यक्तीचा नसतो, तो संपूर्ण व्यवस्थेवर उठतो!” – संजय राऊत यांच्या या जळजळीत वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजय राऊत विरुद्ध संजय शिरसाट: वादाचा उद्रेक नेमका कशामुळे?

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट एका व्हिडीओमुळे अडचणीत आले असून, या व्हिडीओत ते त्यांच्या घरात असल्याचे दिसते आणि त्यांच्याजवळ पैशांनी भरलेल्या बॅगा असल्याचा आरोप आहे.

हा व्हिडीओ संजय राऊत यांनी माध्यमांमध्ये शेअर केल्यानंतर मोठा वाद उफाळून आला. राऊतांच्या या कृतीवर संतप्त होत शिरसाट यांनी मानहानीचा दावा दाखल करण्याची घोषणा केली.

संजय राऊतांचे प्रत्युत्तर : मी काय चोर आहे का?

राऊतांनी हा व्हिडीओ स्वतः शूट केलेला नसल्याचे स्पष्ट करत सांगितले की, “हा व्हिडीओ आधीच मीडियामध्ये झळकला होता. त्यामध्ये मंत्री आक्षेपार्ह अवस्थेत दिसत असून, त्यांच्या बाजूला पैशांच्या बॅगा स्पष्टपणे दिसतात. अशा चित्रांवर प्रतिक्रिया देणं हे माझं संविधानिक कर्तव्य आहे.”

संतगिरीचे पुरावे आमच्याकडे नाहीत –संजय राऊतांची उपरोधिक टीका

संजय शिरसाट हे “अतिविशिष्ट व्यक्ती, महात्मा, संत” असल्याचे म्हणत राऊतांनी उपरोधाने टीका केली. “जर व्हिडीओत जे दाखवले गेले ते खोटं नसेल, तर सरकारने याची सखोल चौकशी केली पाहिजे. हे जे दृश्य आहे, ते माझं नाही, तर सध्या चालू असलेल्या सरकारच्या नैतिकतेचं प्रतिबिंब आहे.

फडणवीस अजून गप्प का?

शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांच्या वागणुकीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राऊतांनी थेट सवाल केला – “सतत नैतिकतेचा डंका वाजवणाऱ्या फडणवीसांनी यावर अजून मौन का पाळलं आहे?”

माझं वैयक्तिक भांडण नाही

राऊतांनी स्पष्ट केलं की, त्यांना शिरसाट यांच्याशी कोणतंही वैयक्तिक वैर नाही. “एक पत्रकार आणि विरोधी पक्ष नेते म्हणून माझं कर्तव्य आहे की, जनतेसमोर सत्य मांडावं. हे मला संविधानाने दिलेला अधिकार आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवर उठणारे प्रश्न वाढत चाललेत. व्हिडीओ वाद केवळ एका मंत्र्याचा नाही, तर संपूर्ण यंत्रणेच्या प्रतिमेचा आरसा आहे. या प्रकारांवर सरकारने केवळ विरोधकांवर कारवाई न करता स्वतःच्या लोकांवरही कठोर भूमिका घ्यावी, हीच अपेक्षा.

हे हि वाचा: ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही 23 मिनिटांत धडा शिकवला – NSA अजित डोभाल

 

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

Exit mobile version