Site icon

विराट कोहली टेस्ट निवृत्तीवर वादंग! मोहम्मद कैफ म्हणतो – तो अजून खेळू शकला असता.

"Colored image of Indian male cricketer in blue uniform holding bat on cricket field"

"Indian cricketer in blue Test uniform holding a bat on the cricket field."

क्रिकेटमधून विराट कोहली टेस्ट निवृत्ती घेतल्यानंतर मोहम्मद कैफने मोठं विधान केलं – “त्याला अजून खेळायचं होतं, पण सपोर्ट मिळाला नाही.”

विराट कोहली टेस्ट निवृत्तीने क्रिकेट विश्व ढवळून निघालं!

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने 12 मे रोजी अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि सर्वत्र चर्चेचा महापूर आला.अनेक चाहत्यांसह क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिल्या. पण माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याचं वक्तव्य मात्र लक्षवेधी ठरलं.

“त्याला अजून खेळायचं होतं, पण…” – मोहम्मद कैफ

कैफ म्हणाला की, “मला वाटतं विराट अजून 1-2 वर्षं टेस्टमध्ये खेळण्याच्या मनःस्थितीत होता. पण कदाचित बीसीसीआय किंवा निवड समितीकडून त्याला हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. मागच्या काही दिवसातील घडामोडी बघता, त्याच्या निवृत्तीमागे काहीतरी वेगळी कारणे असतील ,त्याचा आपणाला अंदाज नाही.”

विराटची इंस्टाग्रामवरून घोषणा, रोहितनंतर त्याचीही एक्झिट

रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी टेस्टमधून निवृत्ती घेतल्यानंतर, विराटनेही इंस्टाग्रामवर पोस्ट करत टेस्टमधून निवृत्ती जाहीर केली. ही सलग दोन मोठ्या खेळाडूंची एक्झिट चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली.

कैफचा दावा – “शेवटचा टेस्ट खेळायचं त्याचं स्वप्न होतं”

कैफ पुढे म्हणतो, “रणजीमध्ये ज्या प्रकारे तो खेळला, ते बघून वाटत होतं की तो अजून शेवटचा एक टेस्ट खेळण्याच्या तयारीत होता. पण निवड समितीच्या धोरणामुळे त्याचं ते स्वप्न मोडकळीत निघालं.”

विराट कोहलीचं चमकदार टेस्ट करिअर 

घटक आकडेवारी
टेस्ट सामने 123
एकूण टेस्ट धावा 9230
शतकं 30
द्विशतकं 7
अर्धशतकं 31
वनडे धावा 14181 (51 शतकांसह)
T20I धावा 4188 (1 शतक)
तीनही फॉरमॅट मिळून सामने 539

 

तुम्हाला महत्वाच्या बातम्या लगेच पाहिजेत का?
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा!


Join WhatsApp Group

Exit mobile version