महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांसाठी ऐतिहासिक आनंदाची बातमी – पुढील पाच वर्षांत वीजदर कपात होणार असून, दरांमध्ये एकूण २६% घट होणार आहे.
महाराष्ट्रात वीजदर कपात; फडणवीसांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून बुधवारी वीज ग्राहकांना मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रात वीजदर कपात केली जाणार असून, पुढील ५ वर्षांत दर एकूण २६% पर्यंत कमी होतील.
वीजदर कपात कशी आणि केव्हा लागू होणार?
फडणवीस यांनी ‘X’ वर दिलेल्या माहितीनुसार,
“राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वीजदर कपात पहिल्या वर्षीच १०% ने केली जात आहे. हा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर महावितरणच्या याचिकेवर आधारित आहे.”
ग्राहक वर्गाला काय फायदा होणार?
घरगुती ग्राहक- विजेच्या दरात थेट घट, दरमहा बिलात बचत
लघुउद्योग व व्यापारी वर्ग- उत्पादन खर्चात घट, नफा वाढण्याची शक्यता
शहरी व ग्रामीण भाग – दोघांनाही लाभ मिळणार
महावितरण ग्राहक- दरकपात थेट बिलांमध्ये परावर्तित होणार
वीजदर कपात मागचं धोरण
महावितरणने MERC कडे दरकपातीसाठी याचिका सादर केली होती. त्यावर आयोगाने हिरवा कंदील दाखवल्याने राज्य शासनाने ही वीजदर कपात अधिकृतपणे जाहीर केली. यामुळे पुढील काही वर्षांत आर्थिक दृष्ट्या दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
वीजबिलात दिलासा, सामान्य ग्राहकांना थेट फायदा
या वीजदर कपातीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, ऊर्जाविषयक धोरणात पारदर्शकता आणि जनहिताची दिशा स्पष्टपणे दिसते.
हे हि वाचा: शक्तीपीठ महामार्गामुळे राज्याच्या तिजोरीला मोठा तडा बसणार?
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!
1 thought on “फडणवीसांचा मोठा निर्णय: वीजदर कपात ५ वर्षांत २६%”