अनिल परब vs योगेश कदम वाद; सावली बार प्रकरण चिघळलं

चोरीचा माल परत दिला, म्हणजे गुन्हा धुतला जात नाही! — अनिल परब यांचा गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर जोरदार हल्लाबोल

Siddhi News:अनिल परब vs योगेश कदम वाद आता चांगलाच पेटला आहे. मुंबईतील सावली बार प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भडका उडाला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत दिल्यानंतर या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू झाली असून, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी थेट गंभीर आरोप करत कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सावली बारचा परवाना परत… पण ‘अनिल परब vs योगेश कदम वाद’ अधिकच पेटला!

कांदिवली येथील सावली बार, जो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर आहे, त्याचा ऑर्केस्ट्रा परवाना अलीकडेच परत करण्यात आला. मात्र, या परवान्याच्या आधारे याठिकाणी डान्स बार सुरू होता, असा आरोप करत अनिल परब यांनी हे प्रकरण अधिक गहिरे केले आहे.

कदम यांनी बार चालवण्याचा करार रद्द केला असला तरी याआधी त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकून २२ बारबाला, २२ ग्राहक आणि ४ कर्मचारी पकडले होते, अशी माहिती समोर आली आहे.

अनिल परब vs योगेश कदम वादात थेट आरोप – गुन्हा घडला असल्याचा दावा!

विधानपरिषदेत अंतिम आठवड्याच्या चर्चेदरम्यान अनिल परब यांनी स्पष्टपणे सांगितले की, या बारमध्ये अवैधरीत्या डान्सबार चालवला जात होता. परवान्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे पोलिस पंचनाम्यांतून स्पष्ट झाले असून, “परवाना परत केला म्हणजे गुन्हा संपला, असं होत नाही” असा घणाघात परब यांनी केला.

लाडकी बहीण म्हणायचं आणि… – परबांचा सडकून हल्ला

अनिल परब यांनी सरकारवर आणि गृहराज्यमंत्री कदम यांच्यावर सडकून टीका करत म्हटलं, “एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे आया-बहीणींना डान्सबारमध्ये नाचवायचं. हेच कायद्याचं राज्य आहे का?”

अनिल परब vs योगेश कदम वादात पुरावे थेट फडणवीसांच्या हाती!

२९ जुलै रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणासंदर्भातील पुरावे — व्हिडीओ क्लिप्स, पोलिस पंचनामे, तांत्रिक दस्तऐवज — अधिकृतरित्या सादर केले. या पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

अनिल परब यांची मागणी – राजीनामा द्या!

तुमच्यावर आशीर्वाद आहे असं म्हणताय, पण तुमच्याच आईच्या नावावर असलेल्या बारमध्ये काय सुरू आहे, हे महाराष्ट्र पाहतो आहे. त्यामुळे योगेश कदम यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. अशी थेट मागणी अनिल परब यांनी विधानसभेत केली आहे.

सावली बार प्रकरण केवळ एका परवान्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यातून राज्यातील राजकीय नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पुढील कारवाई कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे हि वाचा: 1 ऑगस्टपासून UPI चे नवे नियम 2025 लागू होणार

 

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Subscribe

Leave a Comment