Siddhi News: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत मोठा खळबळजनक प्रकार घडला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार अनिल परबांचा आरोप थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर होता. परब यांनी दावा केला की, “योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईत एक डान्सबार सुरू आहे”, जो कायद्याच्या विरोधात आहे. या विधानामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय आहे नेमका अनिल परबांचा आरोप?
अनिल परब म्हणाले की, “राज्यात डान्सबारवर बंदी असतानाही, मुंबईतील कांदिवली परिसरात ‘सावली’ नावाचा डान्सबार सुरु आहे. 30 मे 2025 रोजी समतानगर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी 22 बारबालांना अटक करण्यात आली. या डान्सबारचं परमिट हे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री – ज्योती रामदास कदम यांच्या नावावर आहे.”
मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका
“या प्रकारावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. जर कारवाई केली नाही, तर सरकार यामागे आहे, हे स्पष्ट होईल,” असा इशाराही परब यांनी दिला.
राज्यपालांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह
अनिल परब म्हणाले, “आज आम्ही राज्यपालांना भेटलो. पण आमच्या पर्सनल असिस्टंटला खाली थांबवण्यात आलं. राज्यपाल सुरक्षित नसतील, तर लोकसुरक्षेचं काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
RTO अधिकाऱ्याविरोधातही आरोप
“सचिन पाटील नावाच्या RTO अधिकाऱ्याचा कंत्राटी ड्रायव्हर कपडे घालून थेट रस्त्यावर दंड वसूल करतो. अधिकाऱ्याच्या सोबत गाडीत बसतो आणि चलन मशीन वापरतो. यावरही तातडीने कारवाई व्हावी,” अशी मागणी परब यांनी केली.
अनिल परबांचा आरोप मुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हलचल निर्माण झाली आहे. आता मुख्यमंत्री आणि सरकारची पुढची पावले काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तुमचं या खळबळजनक प्रकरणावर मत काय आहे? खाली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी ब्लॉग वाचहत राहा.
हे हि वाचा: लाडकी बहीण योजना अडचणीत, हजारो महिलांचा लाभ बंद
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!
1 thought on “अनिल परबांचा आरोप : गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार!”