Gopichand Padalkar: राज्याच्या राजकारणात परखड बोलणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबावर नाव न घेता घणाघात केला आहे.
हिंदुत्ववादी मोर्चात गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य
सांगलीतील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणानंतर पुण्यात काढण्यात आलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात पडळकरांनी भाषण करताना एका “कॉकटेल घराण्याचा” उल्लेख करत अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबावर निशाणा साधला.
त्यांनी म्हटलं –
“संकष्टीच्या दिवशी मटण, एकादशीच्या दिवशी चिकन आणि नंतर दगडूशेठला दर्शन… त्या घरात सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच – हे एक कॉकटेल घर आहे.”
हे वक्तव्य ऐकताच उपस्थितांत एकच खसखस पसरली. परंतु या वाक्यांमुळे पडळकर पुन्हा एकदा टीकेच्या झोतात आले आहेत.
गोपीचंद पडळकर यांच्या विधानांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त प्रतिसाद
पडळकरांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पक्षाचे नेते प्रशांत जगताप म्हणाले –
“ज्यांची ग्रामपंचायतीतसुद्धा निवडून येण्याची पात्रता नाही, त्यांना भाजप जबाबदारी देतो आणि ते विरोधकांवर अश्लील टीका करतात. पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोरीप्रकरणी अटक झाली होती. अशा लोकांना नैतिक अधिकार नाही.”
भाजपच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
पडळकर हे याआधीही निवडणुकांदरम्यान शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जातीवाचक, वैयक्तिक आणि धार्मिक टीका करताना दिसले आहेत. मात्र सत्ताधारी भाजपकडून आजवर त्यांच्या विधानांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, यामुळे पक्षाची भूमिकाच सध्या संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की,
“भाजपने जर याकडे दुर्लक्ष केलं, तर येत्या निवडणुकांमध्ये त्यांना याचा मोठा फटका बसू शकतो.”
सामाजिक माध्यमांवरून पडळकरांवर टीकेची झोड
पडळकरांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. नागरिक, कार्यकर्ते, पत्रकार आणि विविध संघटना यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी भाजपकडे पडळकरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भडक विधानं आणि राजकीय गरम हवा
गोपीचंद पडळकर यांची बोलण्याची शैली उग्र आणि धारदार असल्याने त्यांची भाषणं नेहमीच वाद निर्माण करतात. परंतु, अशा वक्तव्यांमुळे विरोधकांवर टीका करताना त्यांनी कोणत्या मर्यादा ओलांडू नयेत, याचं भान राहिलं पाहिजे. अन्यथा, या आगीत भाजपही होरपळू शकतो.
तुमचं मत काय?
पडळकरांचं वक्तव्य योग्य की अतिरेकी? भाजपनं यावर कारवाई करावी का? खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा!
हे हि वाचा – Marathi Morcha: संदीप देशपांडेंचा इशारा – व्यापारी आहात, व्यापार करा; आमचे बाप बनू नका
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!
1 thought on “गोपीचंद पडळकर पुन्हा विवादांमध्ये; टीकेचा बाण थेट पवार घराण्यावर”