Siddhi News: महाराष्ट्राच्या विधानभवनात सत्तेच्या संघर्षाने पुन्हा एकदा तापलेल्या वातावरणाचे दर्शन घडले आहे. आव्हाड-पडळकर समर्थकांमध्ये तुफान राडा झाला असून, या घटनेने विधानभवनाच्या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण केलं आहे.
राजकारण तापलं, आव्हाड-पडळकर समर्थकांमध्ये तुफान राडा
गेल्या काही दिवसांपासून आक्रमकतेतून चर्चेत असलेल्या जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद आता थेट त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. आज सकाळी विधानभवनाच्या लॉबीतच धक्काबुक्कीला सुरुवात झाली आणि आव्हाड-पडळकर समर्थकांमध्ये तुफान राडा झाला.
काल झालेल्या वादाचा आज परिपाक?
कालच्या विधानपरिषदेत शिवीगाळ आणि टोकाचा शाब्दिक वाद झाल्यानंतर आजचा हा प्रकार समोर आला. आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाल्याचा आरोप खुद्द आव्हाड यांनी केला. या घटनेनंतर विधानभवन परिसरात तणावाचं वातावरण होतं.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“हा गुंडगिरीचा प्रकार आहे. सत्तेचा माज असलेले कार्यकर्ते विधानभवनात येऊन आमच्यावर हल्ला करतात. मी आमदार आहे, पण इथे सुरक्षाच नाही,” असं संतप्त आव्हाड म्हणाले. त्यांनी स्पष्ट केलं की, “त्यांनी मला कुत्रा, डुक्कर अशा शिव्या दिल्या. मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन केला जाणार नाही.”
गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया
प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया मागितली असता गोपीचंद पडळकर यांनी “माझं काही देणंघेणं नाही, मला काही माहिती नाही” असं म्हणत प्रसार माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरे यांचा सवाल
विधानभवनातच जर आमदार असुरक्षित असतील, तर लोकांचा विश्वास सरकारवर राहणार कसा?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.
विधानभवनात असे प्रकार घडणे अत्यंत गंभीर आहे. लोकशाहीच्या मंदिरात जर गोंधळ आणि मारहाण होत असेल, तर हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी चिंतेचे संकेत आहेत.
वाचा: हॉलमार्क नसलेलं सोनं खरेदी करणे म्हणजे नुकसान पक्कं!
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!