Siddhi News: “मी काही चोरी केलीय का? गुन्हा केलाय का? फक्त रमी खेळल्याच्या आरोपावरून राजीनामा द्यायचा का?” — असं म्हणत माणिकराव कोकाटे राजीनामा वादावर प्रतिक्रिया देताना कृषीमंत्र्यांनी थेट विरोधकांवर निशाणा साधला.
सद्याच्या राजकीय घडामोडींमध्ये माणिकराव कोकाटे राजीनामा वाद चांगलाच गाजत आहे. राज्याचे कृषीमंत्री कोकाटे सभागृहात मोबाईलवर रमी खेळताना आढळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. मात्र, कोकाटे यांनी आरोप फेटाळत पत्रकार परिषद घेतली आणि ठामपणे भूमिका मांडत व्हिडीओ काढणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला.
माणिकराव कोकाटे राजीनामा वाद : व्हिडीओमुळे राजकीय खळबळ
सभागृहासारख्या गंभीर ठिकाणी मोबाईलवर रमी खेळल्याचा व्हिडीओ समोर आल्यावर राजकीय वातावरण चांगलंच तापलं.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी व्हिडीओ ट्विट करत सरकारवर टीकास्त्र सोडलं. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
“मी काही गुन्हा केला का?” –माणिकराव कोकाटेंचा सवाल
प्रकरण गाजत असतानाही कोकाटेंच्या चेहऱ्यावर चिंता दिसली नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की,
“मी रमी खेळलोच नाही. मला रमी खेळताच येत नाही. माझं बँक अकाऊंट, मोबाईल नंबर कसलंच लिंक नाही.”
त्यांनी पुढे रोष व्यक्त करत विचारलं,
“मी काय विनयभंग केलाय? चोरी केली का? मग राजीनामा का द्यायचा?”
रोहित पवार यांनी X वर SHARE केलेला हा विडिओ पहा
टेक्निकल चूक की मुद्दाम वाद?
कोकाटे यांनी याला “टेक्निकल चूक” ठरवत दावा केला की,
“फोन 5G आहे. काहीतरी टच झालं आणि स्क्रीनवर काही तरी वेगळंच दिसलं. रमी सुरु नव्हती.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, काही सेकंदात त्यांनी स्क्रिन स्किप केली आणि कोणतीही खेळाची क्रिया केली नव्हती.
माणिकराव कोकाटे राजीनामा वाद : कोर्टात जाण्याचा इशारा
आपली बदनामी केल्याचा आरोप करत कोकाटे म्हणाले की,
“ज्यांनी हा व्हिडीओ बनवला त्यांच्याविरुद्ध मी कोर्टात जाईन.”
त्यांनी विधानसभाध्यक्ष, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
“जर मी दोषी आढळलो, तर राज्यपालांकडे थेट राजीनामा देईन,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राजकीय नेत्यांनी वादाच्या भोवऱ्यात येणं नवीन नाही. मात्र माणिकराव कोकाटे यांचा संतप्त आणि आत्मविश्वासपूर्ण प्रतिसाद यामागे काहीतरी वेगळं सांगतोय. हे प्रकरण पुढे न्यायालयात पोहोचतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
तुमचं मत काय? माणिकराव कोकाटे यांचा निष्पापपणा पटतोय का? खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा!
वाचा: UIDAI आधार अपडेट योजना: आता शाळेतच मोफत सेवा!
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!
2 thoughts on “माणिकराव कोकाटे राजीनामा वाद पेटला, कोर्टात जाण्याचा इशारा”