Marathi Morcha: संदीप देशपांडेंचा इशारा – व्यापारी आहात, व्यापार करा; आमचे बाप बनू नका

Siddhi News: मीरा-भाईंदरमध्ये निघालेल्या Marathi Morcha दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडेंनी हिंदी भाषिक व्यापाऱ्यांना थेट इशारा दिला – “इथे धंदा करायला आलात, तर शांतपणे व्यापार करा; आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका!”

Marathi Morcha: पार्श्वभूमी

मीरा-भाईंदर शहरात मराठी भाषेच्या सन्मानासाठी मनसे आणि ठाकरे गटाने संयुक्तरित्या एक भव्य Marathi Morcha आयोजित केला.
प्राथमिक टप्प्यात पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र नागरिकांचा ओघ पाहून अखेर पोलीसही मागे हटले.

संदीप देशपांडेंचा आक्रमक इशारा

“व्यापारी आहात, व्यापार करा!”
या मोर्चात संदीप देशपांडे यांनी भाषण करताना हिंदी भाषिक व्यापाऱ्यांना थेट सुनावलं :

“महाराष्ट्रात आलात तर शांतपणे व्यापार करा. पण राजकारणात नाक खुपसू नका.”

ते पुढे म्हणाले:

“2 हजार मैलांवरून येऊन महाराष्ट्रात दादागिरी नको. इथे काय होईल आणि काय नाही, हे आमचा मराठी माणूस ठरवेल.”

श म्हणत नाही, पण आम्हाला शिकवायला येतात

ज्यांना ‘श’ उच्चारता येत नाही, त्यांनी आम्हाला शिकवायचा प्रयत्न करू नये. आम्हाला केवळ गर्व नाही तर माज आहे, आणि आज आम्ही तो दाखवून दिला आहे, असंही ते म्हणाले.

मराठी माणसाच्या नादाला लागू नका

देशपांडेंनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं :

“मराठी माणूस जर चिडला, तर काय होतं हे सरकारने पाहिलं. त्यामुळे अशा आंदोलनांत एकजूट ठेवा. आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही.”

ठाकरे गटाची साथ – राजन विचारे यांची भावना

ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनीही यावेळी मराठी लोकांच्या एकतेचं कौतुक केलं. ते म्हणाले :

“आज सर्व जाती-धर्मातील मराठीप्रेमी लोक एकत्र आले आहेत. पूर्वी मुंबई मोर्च्याला मज्जाव केला होता, पण आज मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा मोठ्या प्रमाणात निघाला, आणि तो यशस्वी ठरला.”

मीरा-भाईंदरचा Marathi Morcha म्हणजे केवळ आंदोलन नव्हतं, तर एक संस्कृती, अस्मिता आणि भाषेच्या सन्मानासाठीची गर्जना होती.
संदीप देशपांडे यांची आक्रमक भूमिका आणि लोकांचा प्रतिसाद पाहता, मराठी अस्मिता पुन्हा एकदा जोमात येताना दिसतेय.

तुम्ही मराठी असल्याचा अभिमान बाळगा… आणि ही बातमी इतर मराठी बांधवांपर्यंत जरूर पोहोचवा!

हे हि वाचा : भाजप खासदार निशिकांत दुबे मराठी वादग्रस्त विधान: महाराष्ट्रात संतापाची लाट

हे हि वाचा : Hallmarking Gold का खरेदी करावे? जाणून घ्या 10 फायदे

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Subscribe

1 thought on “Marathi Morcha: संदीप देशपांडेंचा इशारा – व्यापारी आहात, व्यापार करा; आमचे बाप बनू नका”

Leave a Comment