Siddhi News: 41 वर्षांनंतर पुन्हा एक भारतीय अंतराळात जाऊन यशस्वीपणे पृथ्वीवर परतला!
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि गगनयात्री शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले असून, कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांनी सुरक्षित लँडिंग केली आहे.
शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले, 18 दिवसांची अवकाश यात्रा पूर्ण
अमेरिका, पोलंड आणि हंगेरीच्या तीन अंतराळवीरांसह शुभांशू शुक्ला यांनी 18 दिवस अंतराळात घालवले. या काळात त्यांनी 60 हून अधिक शास्त्रीय प्रयोग पूर्ण केले, ज्यात भारताचे 7 महत्त्वाचे प्रयोगही होते. विशेषतः, अंतराळात मेथी आणि मूग यांच्या अंकुरणाचा अभ्यास केला गेला.
केव्हा आणि कसं झाली मोहिम?
२५ जून २०२५: शुभांशू शुक्ला फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘फाल्कन 9’ रॉकेटने अंतराळात गेले.
१४ जुलै २०२५: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीच्या दिशेने प्रयाण.
१५ जुलै २०२५: कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर ‘ड्रॅगन’ यानाचं यशस्वी लँडिंग.
भारताचा अंतराळात ऐतिहासिक पुनरागमन
१९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत यानातून अंतराळ प्रवास केला होता. त्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी शुभांशू शुक्ला हे अंतराळात जाऊन सुखरूप परतले आहेत.
त्यांचा हा अनुभव भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी मोलाचा ठरणार आहे, जी २०२७ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे.
काय होती प्रयोगांची वैशिष्ट्ये?
शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात:
भारतीय वनस्पतींवर प्रयोग
अवकाशातील मानवी शरीरावर होणारे परिणाम
आणि विविध वैज्ञानिक तांत्रिक चाचण्या पूर्ण केल्या.
हे सर्व प्रयोग भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी दिशा ठरवतील.
शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले,लँडिंगनंतर काय?
लँडिंगनंतर सर्व अंतराळवीरांना तातडीने समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. त्यांना सावरण्यासाठी पुढील १० दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुभांशू शुक्ला भारतात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारताच्या अंतराळयुगात नवा अध्याय
शुभांशू शुक्ला यांची ही यशस्वी मोहिम केवळ एक परतणं नाही, तर भारताच्या अंतराळ भविष्याचा पाया आहे. या प्रवासाने भारताचा जागतिक अवकाश संशोधनात विश्वास अधिक बळकट केला आहे.
भारतीय विज्ञान, अंतराळ संशोधन व शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले या ऐतिहासिक क्षणाबद्दल तुमचं मत काय? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा!
वाचा: Tesla Model Y भारतात दाखल; किंमत ₹59.9 लाखांपासून सुरू
आणखी वाचा: भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवड वर मोठा निर्णय; पंतप्रधान मोदींचा पुढचा डाव ठरेल निर्णायक
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!
1 thought on “जय हिंद! 18 दिवसांनी शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले”