शशिकांत शिंदे मैदानात, राष्ट्रवादीचं (शरद पवार गट) नवं नेतृत्व

राजकारणात सत्तेच्या समीकरणांची भाकरी कधी कुठे फिरते सांगता येत नाही. पण या वेळी शरद पवारांनी फिरवलेली भाकरी एक नवा इतिहास घडवेल का?

Siddhi News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड होताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. पक्षसंघटनेपासून ते सत्तेत पोहोचण्याचा निर्धार त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

शशिकांत शिंदेच्या नावावर एकमत

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शशिकांत शिंदे यांचं नाव एकमताने पुढे आलं. त्यामुळे शरद पवार गटाने पक्षाला बळकट करण्यासाठी नव्या दमाचे नेतृत्व निवडल्याचे स्पष्ट होते.

पहिली प्रतिक्रिया: मी रस्त्यावर उतरेन

प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर शिंदे यांनी स्पष्ट केलं की, “मी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी तयार आहे. गरज पडल्यास रस्त्यावर उतरूनही लढेन”. त्यांनी पक्षाला सत्तेत आणण्याचा निर्धार व्यक्त करत “दिवसरात्र मेहनत घेणार आहे”, अशी ग्वाही दिली.

अन्यायाविरोधात आवाज

शिंदे यांनी स्पष्ट केलं की, “माझं कर्तव्य म्हणजे गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणं. पक्षसंघटना मजबूत करणे आणि बदललेल्या राजकारणात जनतेची बाजू मांडणे हे माझं उद्दिष्ट आहे.”

पक्षात संधी, जबाबदारी मोठी

शिंदे म्हणाले, “पक्षात अनेक दिग्गज नेते असूनही मला संधी देण्यात आली याबद्दल मी कृतज्ञ आहे. सामान्य घरातून आलेला कार्यकर्ता नेता कसा होतो हे मी दाखवून देईन.”

पुढील आव्हान: स्थानिक निवडणुका

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. शिंदेंच्या नेतृत्वाची खरी कसोटी तेव्हाच लागणार आहे. “सत्ताबदल आता यंत्रणांच्या वापराने होतो. हे बदललेलं राजकारण मी लोकांपर्यंत नेणार आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शरद पवारांच्या निर्णयामुळे आता पक्षाला नव्या दमाचे नेतृत्व लाभले आहे. शशिकांत शिंदेंच्या शैलीकडे आणि कामगिरीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. पक्ष सत्तेत येऊन इतिहास घडवतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

तुमचं मत काय?
शशिकांत शिंदे यांचं नेतृत्व राष्ट्रवादीला सत्तेपर्यंत घेऊन जाईल का?
कमेंट करा आणि शेअर करा!

वाचा: जय हिंद! 18 दिवसांनी शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Subscribe

1 thought on “शशिकांत शिंदे मैदानात, राष्ट्रवादीचं (शरद पवार गट) नवं नेतृत्व”

Leave a Comment