Siddhi News: सुशील केडिया यांचं वादग्रस्त विधान, मराठी शिकणार नाही! मनसे आक्रमक
मुंबईतील एका सोशल मीडिया पोस्टने पुन्हा एकदा भाषेचा वाद पेटवला आहे. गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी थेट सांगितलंय की, ते मराठी शिकणारच नाहीत – आणि तेही मनसेप्रमुख राज ठाकरेंना टॅग करत!
सुशील केडिया वाद: राज ठाकरेंना थेट इशारा – “काय करायचं ते करा!”
मिरारोडमध्ये अमराठी दुकानदाराला मारहाण झाल्यानंतर, केडिया यांनी एक्स (Twitter) वरून एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. “मुंबईत ३० वर्षे राहूनही मी मराठी शिकलेलो नाही. आणि जोपर्यंत राज ठाकरेसारखे लोक मराठी माणसाची देखभाल करत असल्याचं नाटक करत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही,” असं त्यांनी ठणकावलं. पोस्टच्या शेवटी त्यांनी राज ठाकरेंना टॅग करत लिहिलं – “काय करायचं ते करा!”
सुशील केडिया वाद: मनसेची तात्काळ प्रतिक्रिया
केडियांच्या या वक्तव्यावर मनसेने उग्र प्रतिक्रिया दिली. “मराठीचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही,” असा थेट इशारा दिला. सोशल मीडियावरही या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
कोण आहेत सुशील केडिया?
सुशील केडिया हे देशातले प्रख्यात शेअर बाजार तज्ज्ञ असून, Kedianomics ही स्वतःची रिसर्च फर्म ते चालवतात. ते विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँकांसोबत काम करत आले आहेत. ‘मार्केट टेक्निशियन्स असोसिएशन’च्या संचालक मंडळावर निवडले जाणारे ते आशियातील पहिले सदस्य आहेत.
मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक असूनही त्यांनी मराठी न शिकण्याची उघड घोषणा केल्यामुळे हा मुद्दा आणखीच पेटला आहे.
सुशील केडिया वाद:भाषा भावना आहे, गर्व नव्हे
सुशील केडिया यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. भाषेचा अपमान सहन न करणाऱ्या मनसेसह, अनेक नागरिकांनी यावर कडक शब्दांत टीका केली आहे. हा वाद केवळ राजकीय नसून, सांस्कृतिक अस्मितेशी जोडलेला आहे.
तुमचं मत काय? सुशील केडिया यांचं वक्तव्य योग्य आहे का? तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये जरूर नोंदवा.
हे हि वाचा- New Box Office Queen: रश्मिकाचा 6 महिन्यांत 1000 कोटी क्लब
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!