Siddhi News: जुनं सोनं विकायचंय? तुमच्याकडे वारसाहक्कात मिळालेलं, जुने आणि हॉलमार्क नसलेलं सोनं असेल, तर विक्रीपूर्वी एक अत्यावश्यक पाऊल उचलणं खूप महत्त्वाचं आहे — कारण अनेक वेळा २२ कॅरेट सोनं देखील १८ किंवा २० कॅरेट म्हणून खपवलं जातं आणि विक्रेत्याचं मोठं नुकसान होतं.
जुनं सोनं विकायचंय का? तर त्यात नेमका धोका काय असतो हे आधी समजून घ्या!
आपल्या पूर्वजांकडून मिळालेलं सोनं बहुतांश वेळा हॉलमार्क नसलेलं असतं. अशावेळी सोनाराच्या बोलण्यावरच आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. आणि इथेच सुरू होतो गोंधळ! शुद्ध २२ कॅरेट सोन्याचं मूल्य कमी सांगून, काही सोनारे त्यातून मोठं नफा कमवतात.
जुनं सोनं विकायचंय ? आणि योग्य दर हवा? मग ‘हॉलमार्किंग’ करा!
पुरातन सोनं विकण्यापूर्वी, BIS मान्यताप्राप्त केंद्रात जाऊन त्याची शुद्धता तपासून घ्या. शुद्धतेची खात्री झाली की तुम्ही BIS हॉलमार्किंग करून घेऊ शकता. हे एक सरकारी हमीपत्र असतं, जे तुमच्या सोन्याच्या शुद्धतेला प्रमाणित करतं.
हे तर आवर्जून वाचा : What is Hallmarking:हॉलमार्किंग म्हणजे काय? सोन्याची शुद्धता कशी ओळखावी ते समजून घ्या
जुना दागिना हॉलमार्क कसा कराल?
BIS च्या मानक manakonlion.in च्या पेज ला भेट द्या. – आपल्या शहरातील अधिकृत हॉलमार्क केंद्र शोधा.
दागिन्यांचं परीक्षण – हॉलमार्किंग सेंटर मध्ये वेगवेगळ्या तपासण्या करतात.
हॉलमार्किंग प्रक्रिया – सोनं किती कॅरेटचं आहे, हे तपासून BIS कडून त्यावर हॉलमार्क केलं जातं.
खर्च किती येतो?
₹200: परीक्षण शुल्क
₹45 प्रति दागिना: हॉलमार्किंग फी
छोटा खर्च आणि मोठा फायदा – कारण शुद्धतेचं प्रमाणपत्र मिळालं की, सोनं विकताना कोणताही सोनार तुम्हाला फसवू शकत नाही!
कोणत्या कॅरेटमध्ये किती टक्के सोनं असतं?
कॅरेट | सोने (%) | इतर धातू (%) | माहिती |
---|---|---|---|
24 | 99.9% | 0% | सर्वात शुद्ध सोने |
22 | 91.6% | 8.4% | 22 भाग सोने + 2 भाग इतर धातू (चांदी, तांबे) |
18 | 75% | 25% | 18 भाग सोने + 6 भाग इतर धातू |
14 | 58.3% | 41.7% | 14 भाग सोने + 10 भाग इतर धातू |
नवीन दागिने घेताना काय काळजी घ्याल?
BIS हॉलमार्क पाहा – त्रिकोणी चिन्हासह HUID नंबर असतो.
दागिन्याची कॅरेट आणि वजन स्पष्टपणे तपासा.
जर स्टोन असलेला दागिना असेल, तर सोनं आणि स्टोनचं वजन वेगळं बघा.
बिलामध्ये सोनं, स्टोन, डायमंड यांचे दर वेगवेगळे नमूद झालेत का ते पाहा.
दागिन्यावर यूनिक कोड आणि सोनाराचं नाव लिहिलं आहे का ते तपासा.
पुरातन सोनं विकण्याचा विचार करताय? मग आधी त्याची हॉलमार्किंग करून घ्या. थोडं मेहनत आणि थोडा खर्च करून, तुम्ही हजारो रुपयांचा फसवा व्यवहार टाळू शकता. शहाणा विक्रेता बनण्याचा मार्ग – शुद्धतेची खात्री आणि सरकारी हॉलमार्क!
आजच BIS चं अधिकृत केंद्र शोधा आणि तुमच्या पुरातन सोन्याचं हॉलमार्किंग करून घ्या – योग्य दर मिळवा आणि फसवणुकी पासून वाचा!
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!
1 thought on “जुनं सोनं विकायचंय? तर थांबा! हे आधी करा”