बंगलोरमध्ये चालत्या गाडीत अश्लील वागणूक; कपलला दंड आणि पोलिसांचा कडक इशारा

बंगलोरच्या रस्त्यांवर एका तरुण कपलच्या चालत्या गाडीत अश्लील वागणूक मुळे सोशल मीडियावर वादाचा भडका उडाला आहे. चालत्या गाडीतून सनरूफमधून बाहेर उभं राहून सार्वजनिक ठिकाणी प्रेम प्रदर्शन केल्यामुळे पोलिसांनी तात्काळ दंडात्मक कारवाई केली आहे.

ही घटना हलसुरु ट्राफिक पोलिसांच्या हद्दीत घडली. एका प्रवाशाने शूट केलेल्या व्हिडिओमध्ये कपल गाडीच्या सनरूफमधून उभं राहून एकमेकांना चुंबन देताना आणि जवळीक करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

चालत्या गाडीत अश्लील वागणूक वर पोलिसांची कारवाई:

कर्नाटक नंबरच्या त्या वाहनाचा शोध घेऊन ट्राफिक पोलिसांनी गाडी मालकाला एकूण ₹1,500 दंड ठोठावला आहे.

₹1,000 – धोकादायक वाहनचालना

₹500 – इतर सामान्य नियमभंग

पोलिसांनी म्हटलं, “सार्वजनिक ठिकाणी अशा वागणुकीमुळे इतर चालकांचं लक्ष विचलित होऊ शकतं आणि अपघात होण्याची शक्यता वाढते.”

लोकांची प्रतिक्रिया आणि दुसरी घटना:

या व्हिडिओनंतर लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. लोकांनी सोशल मीडियावर अशा असभ्य वागणुकीविरोधात आवाज उठवला.

याच दरम्यान, मडवारा मेट्रो स्टेशनमध्येही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक कपल सार्वजनिक ठिकाणी जवळीक करताना दिसून आलं. या घटनेवरही नेटिझन्सनी संताप व्यक्त करत मेट्रो प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचं स्वातंत्र्य असलं, तरी त्यासोबत सामाजिक भान राखणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सोशल मीडियासाठी स्टंट किंवा व्हायरल व्हिडिओच्या मागे धावताना आपण काय उदाहरण देतोय, याचाही विचार व्हावा.

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

Leave a Comment