सोनं खरेदी करणे सध्या धोकादायक का? गुंतवणूकदारांची भूमिका

सोनं खरेदी करणे सध्या धोकादायक आहे – फक्त किंमत नाही, समस्या खूप मोठी!

Siddhi News: गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमती जरी उच्चावर असल्या, तरी सोनं खरेदी करणे सध्या धोकादायक आहे.असं मत अनुभवी इन्व्हेस्टमेंट बँकर सर्थक आहूजा यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर करत सोन्याच्या सध्याच्या बाजारातील धोक्यांवर लक्ष वेधलं.

सोनं खरेदी करणे सध्या धोकादायक का?

सार्थक आहूजा म्हणतात, “सध्या सोनं खरेदी करणे सध्या धोकादायक आहे, आणि हे फक्त किंमतीमुळे नाही.” गेल्या महिन्यात सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीत तब्बल ६०% पेक्षा अधिक घट झाली आहे, जी मागील पाच वर्षांतली सर्वात मोठी घसरण आहे.

ज्वेलर्स सध्या लोकांना आकर्षित करण्यासाठी मेकिंग चार्जवर सवलती देत आहेत, पण किंमती जवळपास १ लाख रुपये प्रति १० ग्रॅम असल्याने मागणी मंदावलेली आहे. त्यामुळे अनेक ज्वेलर्सनी उत्पादनही अर्ध्याहून कमी केले आहे.

सोनं विकणंही आता नफ्याचं नाही!

आहूजा यांचं म्हणणं आहे की, “जर तुम्ही सध्या सोनं विकण्याचा विचार करत असाल, तर ज्वेलर्सकडून बाजार भावापेक्षा कमी किंमत मिळण्याची शक्यता जास्त आहे.” यामागे कारण म्हणजे अनविक्रीत सोन्याची साठा मोठ्या प्रमाणात असणे.

तीन महत्त्वाच्या बाजार ट्रेंड्स

१. कमी कॅरेट सोन्याकडे वळण

जास्त कॅरेट सोन्याच्या तुलनेत, ज्वेलर्स आता १४ कॅरेट सोन्याला प्राधान्य देत आहेत. काही ज्वेलर्स BIS कडून ९ कॅरेट सोन्यासाठी हॉलमार्किंगची मागणी करत आहेत, जेणेकरून ग्राहकांसाठी स्वस्त पर्याय उपलब्ध व्हावा.

२. चांदीची वाढती मागणी

सोन्याच्या उलट, चांदीच्या मागणीत सतत वाढ होत आहे. खासकरून इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगामुळे मागणी वाढल्याने चांदीचा तुटवडा वाढला आहे. त्यामुळे चांदीच्या किमती पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे.

३. नक्कल दागिन्यांचा वाढता बाजार

सोनं महागडे होत असल्यामुळे, D2C (डायरेक्ट-टू-कस्टमर) ब्रँड्समधून सोन्याच्या थराचे (Gold plated) किंवा नकली (Artificial ) दागिन्यांची मागणी वाढत आहे. या क्षेत्रात अजून बरेच संधी उपलब्ध आहेत, असा विश्वास आहूजांचा आहे.

आवर्जून वाचा: हॉलमार्किंग म्हणजे काय? सोन्याची शुद्धता कशी ओळखावी ते समजून घ्या

सध्याची सोनं-चांदीची किंमत काय आहे? 

मंगळवारी दिल्लीत ९९.९% शुद्ध सोन्याची किंमत ₹९९,३७० प्रति १० ग्रॅम झाली, जी सोमवारी ₹९९,५७० होती. ९९.५% शुद्ध सोनं ₹९८,८०० वर आलं आहे. चांदीच्या किमतीतही मोठी घट झाली असून, ती ₹१,१२,००० प्रति किलो झाली आहे.

गुंतवणूकदारांसाठी सोनं खरेदी करणे सध्या धोकादायक ठरू शकते, कारण किंमत आणि विक्रीत घट याशिवाय बाजारात अनिश्चितता आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा आणि पर्यायांचा विचार करावा.

नक्की वाचा: Hallmarking Gold का खरेदी करावे? जाणून घ्या 10 फायदे

तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला का? तुमच्या गुंतवणूक योजना आणि अनुभव आमच्यासोबत शेअर करा!

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Subscribe

Leave a Comment