पाकिस्तानी टीम भारतात येणार? नवा वाद भडकण्याची शक्यता

पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता आशिया कपसाठी पाकिस्तानी टीम भारतात येणार असल्याच्या चर्चांनी नव्या राजकीय आणि जनभावनात्मक वादाला तोंड फुटलं आहे.

पाकिस्तानी टीम भारतात खेळायला येणार? परवानगी मिळाली? ? मंत्रालयाकडून हिरवा कंदील

आगामी आशिया कप 2025 हॉकी स्पर्धा बिहारमधील राजगीर येथे 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा पुरुष हॉकी संघ भारतात येऊ शकतो, अशी माहिती क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, “बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणत्याही देशाला रोखणं शक्य नसतं. ही द्विपक्षीय मालिका नसून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आहे.” त्यामुळे पाकिस्तानी संघाला भारतात प्रवेश मिळण्याची शक्यता अधिकच वाढली आहे.

स्पर्धांमधून रोखलं, तर यजमानपद धोक्यात?

मंत्रालयाच्या भूमिकेनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा स्पर्धांमध्ये विरोध दर्शवला, तर भविष्यात भारताचं यजमानपद मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. त्यामुळेच पाकिस्तानसारख्या देशांच्या सहभागाला मूक संमती दिली जाते, असं सूत्रांचं मत.

BCCIने भूमिका स्पष्ट केलेली नाही

आता प्रश्न उभा राहतो तो क्रिकेट आशिया कपमधील सहभागाचा. पाकिस्तान विरुद्ध भारत सामना होणार का? याबाबत अजून BCCIनं अधिकृत भूमिका घेतलेली नाही.

राजकीय प्रतिक्रिया

पहलगाममधील अलीकडील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे.

ते म्हणाले, “धर्म विचारून आमच्या लोकांना ठार मारणाऱ्या देशाला आपण मैत्रीचा हात द्यायचा? पहलगाम हल्ल्यातील रक्तही वाळलेलं नाही आणि आपण पाकिस्तानी संघाला पायघड्या घालतोय? हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ही केंद्र सरकारची ‘न्यू नॉर्मल’ भूमिका का?”

पाकिस्तानी टीम भारतात येणार की नाही, यावर अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट नाही. मात्र, देशात याबाबतचा संताप वाढत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा नियम आणि देशाच्या सुरक्षेतील तडजोड यामधील समतोल साधणे केंद्र सरकारपुढील मोठं आव्हान ठरत आहे.

हे हि वाचा: Gold Rate Today: आज सोनं 99 हजार पार, चांदीनेही घेतली उसळी!

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Subscribe

1 thought on “पाकिस्तानी टीम भारतात येणार? नवा वाद भडकण्याची शक्यता”

Leave a Comment