Pm Narendra Modi Visited Adampur: पंतप्रधान मोदींचा आदमपूर दौरा: वायुदलाच्या शौर्याला सलाम, पाकिस्तानला थेट प्रत्युत्तर !

ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदींची आदमपूर एअरबेसला (Pm Narendra Modi Visited Adampur)भेट, पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना फोल ठरवणारा ठाम संदेश. जाणून घ्या या दौऱ्यामागचं महत्त्व.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसला (Pm Narendra Modi Visited Adampur)अचानक भेट देत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर यामध्ये रणनीती, मनोबल आणि स्पष्ट संदेश यांचा स्पष्ट संगम होता. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हा पंतप्रधान मोदींचा पहिला दौरा आहे.

जवानांचा सन्मान, पाकिस्तानला उत्तर

दिल्लीतील पालम विमानतळावरून त्यांनी उड्डाण केलं आणि थेट जालंधरजवळील आदमपूर एअरबेसवर (Pm Narendra Modi Visited Adampur) दाखल झाले. जवळपास एक तास त्यांनी एअरबेसवर वेळ घालवला आणि भारतीय वायुदलाच्या (IAF) जवानांशी थेट संवाद साधला.आणि जवानांचे धैर्य आणि मनोबल वाढवले.

या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी जवानांच्या धाडसाचं, कर्तव्यनिष्ठतेचे आणि देश सेवेचं विशेष कौतुक केलं. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, भारत आपल्या सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन करणार नाही.

पाकिस्तानचे खोटे दावे फोल ठरले

अलीकडे पाकिस्तानने असा दावा केला होता की, त्यांच्या अचूक हल्ल्यांमुळे आदमपूर एअरबेसला मोठं नुकसान झालं आहे. पण आता पंतप्रधान मोदींच्या आदमपूर एअरबेसच्या प्रत्यक्ष भेटीने हे खोटं सिद्ध झालं. सोशल मीडियावरून आणि सरकारी फोटोंमधून जगाला दिसून आलं की, एअरबेस पूर्णपणे सुरळीत आहे आणि कार्यरत आहे.

या भेटीद्वारे पंतप्रधानांनी पाकिस्तानला आणि इतर शत्रू राष्ट्रांना ठाम संदेश दिला – “भारताला डोळे दाखवण्याचा प्रयत्न केलात, तर त्याचे परिणाम गंभीर असतील.”

आदमपूर एअरबेस – सामरिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठिकाण

आदमपूर एअरबेस ही केवळ एक लष्करी तळ नाही, तर भारताच्या उत्तर सरहद्दीचं पहिलं संरक्षण कवच आहे.

महत्त्वाची वैशिष्ट्यं:

भारताची दुसरी सर्वात मोठी एअरफोर्स स्टेशन.

जालंधरपासून फक्त २१ किमी, तर पाकिस्तानच्या सीमेलाच १०० किमी अंतरावर.

मिग-29 फायटर जेट्सचं मुख्य बेस.

राफेल, सुखोई-30, मिराज यांसारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचे तळ.

1965, 1971 आणि कारगिल युद्धांमध्ये आदमपूरने निर्णायक भूमिका बजावली आहे.

नुकत्याच यशस्वी ठरलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये येथून उड्डाण करून वायुदलाने अचूक हल्ले केले.

ऑपरेशन सिंदूर – काय आहे यामागची कथा?

ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या संरक्षण दलांनी पहलगाम हल्य्याच्या बदला म्हणून अलीकडे पार पाडलेलं एक गुप्त आणि अचूक नियोजनबद्ध ऑपरेशन होतं. यामध्ये पाकिस्तानच्या विविध लष्करी तळांवर सटीक हल्ले करण्यात आले. आदमपूर येथून उड्डाण केलेल्या फायटर जेट्सनी या मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

जवानांचा आत्मविश्वास उंचावला.

पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे जवानांमध्ये प्रचंड जोश आणि उत्साह दिसून आला. ही भेट (Pm Narendra Modi Visited Adampur) एकप्रकारे त्यांच्या मनोधैर्याला चालना देणारी, तर दुसऱ्या बाजूला देशवासीयांना दिलासा देणारी ठरली.

आदमपूर एअरबेसला झालेली ही अचानक भेट (Pm Narendra Modi Visited Adampur) म्हणजे भारताची सुरक्षा सज्जतेची जगासमोर ठळक घोषणा होती. ही भेट म्हणजे केवळ एअरबेसचा दौरा नव्हता, तर भारताचं लष्करी आणि नैतिक बळ दाखवण्याचा ठोस प्रयत्न होता.आणि देश किती सज्ज आहे, मनानेही आणि तंत्रज्ञानानेही हे दाखवून दिले.

हे ही वाचा

SOURCE: News18

1 thought on “Pm Narendra Modi Visited Adampur: पंतप्रधान मोदींचा आदमपूर दौरा: वायुदलाच्या शौर्याला सलाम, पाकिस्तानला थेट प्रत्युत्तर !”

Leave a Comment