सोनू सूद (Sonu Sood) शेतकऱ्याच्या मदतीला धावला, थेट बैलजोडीचं वचन!

Siddhi News: “अभिनेता असावा तर सोनू सूद सारखा !”  संकटात असलेल्या सामान्य माणसांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सोनू सूद यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचं दर्शन घडलं आहे. लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतः औत ओढत शेती करत असल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतरच Sonu Sood शेतकऱ्याला मदत करण्यासाठी थेट पुढे सरसावले. फक्त सहानुभूती नव्हे, तर थेट फोन करून बैलजोडी पाठवण्याचं आश्वासन दिलं!

एका कलाकाराची अस्सल संवेदना: (sonu sood) पुन्हा चर्चेत!

लातूरमधल्या एका शेतकऱ्याच्या संघर्षावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या असतानाच, अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा मदतीस धावून आला आहे. शेतकऱ्याच्या कष्टाची दखल घेत त्याने थेट फोन करून बैलजोडी पाठवण्याचं आश्वासन दिलंय!

लातूरच्या शेतकऱ्याचा हृदयस्पर्शी संघर्ष

लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावातील अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार हे दाम्पत्य खर्च परवडत नसल्यामुळे बैलाऐवजी स्वतः औत ओढत शेतात मशागत करत होते. ही दृश्यं समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद उमटला.

सोनू सूद (sonu sood) शेतकऱ्याला मदत करायला पुढे

“तुमचा संघर्ष खूप मोठा आहे. मी तुमच्यासाठी लवकरच एक जोडी बैल पाठवतो,” असा शब्द सोनू सूद यांनी या शेतकरी दाम्पत्याला फोनवरून दिला. याआधी कोरोना काळातही सोनू सूदने हजारो लोकांना मदत करून खऱ्या अर्थाने माणुसकी जिवंत ठेवली होती.

अजित पवार गटाचाही पुढाकार

अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अंबादास पवार यांना ₹40,000 ची रोख मदत केली असून, त्यांच्या नातवाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचं आश्वासनही दिलं आहे. अजित पवार यांचे खासगी सहाय्यक यांनीही थेट संपर्क साधला आहे.

राहुल गांधींचं सरकारवर जोरदार निशाणा

राहुल गांधींनी महाराष्ट्रात केवळ ३ महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलं की, “ही आकडेवारी नाही, ही उद्ध्वस्त झालेली ७६७ कुटुंबं आहेत.” शेतकऱ्यांच्या वाढत्या समस्या, महाग बियाणं, महाग डिझेल, आणि कमी उत्पन्न यावर त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

माणूसकी ही अजूनही शिल्लक आहे!

सोनू सूद(sonu sood)सारखे कलाकार, सामाजिक संघटना, आणि काही राजकीय गट शेतकऱ्यांसाठी खरंच काही तरी करत आहेत — ही दिलासा देणारी बाब आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलंही सामूहिक कर्तव्य आहे.

हे हि वाचा- राजकीय नेत्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली? संपूर्ण यादी येथे

 

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

WhatsApp Group
Join Now
WhatsApp Channel
Join Now

1 thought on “सोनू सूद (Sonu Sood) शेतकऱ्याच्या मदतीला धावला, थेट बैलजोडीचं वचन!”

Leave a Comment