“नाहीतर मीही सुशांतसारखी संपले असते…” – या एकाच वाक्यातून तनुश्री दत्ताने तिच्या मनातील व्यथा आणि भीती उघड केली आहे.
Siddhi News: Tanushree Dutta allegations on Nana Patekar: अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, कारण तिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार-पाच वर्षांपासून तिला मानसिक आणि शारीरिक छळाचा सामना करावा लागत आहे. या आरोपांनी बॉलिवूड पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे.
“माझ्या जीवावर उठलाय नाना पाटेकर” – तनुश्री दत्ता
तनुश्री दत्ताने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत तिच्यावर सुरू असलेल्या छळाची माहिती दिली. रडत रडत तिने सांगितलं की, तिच्या घरातही तिला असुरक्षित वाटतंय. तिने नाना पाटेकरवर गंभीर आरोप करत म्हटलं, “तो मराठी माणूस असल्याने सहानुभूती घेतो, पण प्रत्यक्षात त्याचे गुन्हेगारी विश्वाशी संबंध आहेत.”
मानसिक छळ, फॉलो करणं आणि हॅकिंगचा दावा
ABP माझाशी बोलताना तनुश्रीने सांगितले की, काही लोकांनी तिचा पाठलाग केला, तिचे प्रोजेक्ट्स बिघडवले, आणि तिचे ईमेल व फोन हॅक करून तिची वैयक्तिक माहिती मिळवली. “2020 नंतर मला कामांपासून दूर ठेवलं गेलं,” असं ती म्हणाली.
जेवणात काहीतरी मिसळलं जात होतं, रिक्षाचे ब्रेक फेल
2022 मध्ये तिच्या घरात काम करणारी महिला तिच्या जेवणात काहीतरी मिसळत असल्याचा आरोप तिने केला. त्यामुळे ती आजारी पडायची. “जेव्हा मी उज्जैनला गेले, तेव्हा माझ्या रिक्षाचे ब्रेक फेल झाले. हा अपघात मुद्दाम घडवून आणला गेला,” असं ती म्हणाली.
सुशांतप्रमाणेच माझ्याबाबतीतही घटना घडतायत
“सुशांतसिंह राजपूतसारखेच प्रकार माझ्यासोबत घडले. फरक इतकाच की, तो गेला आणि मी अजूनही जिवंत आहे,” असं ती भावनिक स्वरात म्हणाली. तिने यामागे बॉलिवूडमधील माफिया गँग असल्याचा आरोप केला आहे.
मराठी माणसाला पोलिसांचा पाठिंबा – तनुश्रीचा दावा
“मी परप्रांतीय असल्यामुळे मला कोणताही न्याय मिळत नाही. पण नाना पाटेकरला मराठी असल्याने पोलिस आणि मंत्री पाठिंबा देतात,” असं स्पष्ट करत तिने सिस्टमवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
माझ्या स्टारडमचा वापर करून त्याने स्वतःचं करिअर उभं केलं
तनुश्रीने दावा केला की, 2008 मध्ये ती एका मोठ्या स्टार होती, आणि नाना पाटेकरच्या हातात कोणतंही मोठं काम नव्हतं. “निर्माते माझ्याकडे यायचे आणि सांगायचे की, जर तू ही फिल्म केलीस तर विकली जाईल,” असं ती म्हणाली. नानाने तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला, असा आरोपही तिने केला.
कोण आहे तनुश्री दत्ता?
2004 मध्ये मिस इंडिया विजेतेपद मिळवलेल्या तनुश्रीने ‘Sssshhh…’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 2018 मध्ये तिने #MeToo मोहिमेची सुरुवात करत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आणि ती बातमीसाठी चर्चेचा विषय बनली.
तनुश्री दत्ताचे आरोप हे केवळ वैयक्तिक दुखावणीपुरते मर्यादित नाहीत, तर बॉलिवूडमधील गूढ, दबलेली बाजू उघड करत आहेत. न्यायसंस्थेने याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे.
वाचा: शरद पवारांची फडणवीसांवर स्तुतीसुमने; राजकीय चर्चेला ऊत
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!
1 thought on “तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर खळबळजनक आरोप”