Siddhi News:ठाकरे, फडणवीस, शिंदे, पवार यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली? जाणून घ्या महाराष्ट्रातील राजकीय घराण्यांचं शालेय शिक्षण प्रोफाइल!
मुंबईतल्या बॉम्बे स्कॉटिशपासून बारामतीच्या शिक्षण संस्थांपर्यंत, नेत्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली?
राजकारणात अनेक मुद्द्यांवरून टीका होते, पण यंदा चर्चेत आलाय एक वेगळाच विषय – महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि त्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली?
मुख्यमंत्री फडणवीसांच्या एका टीकेनं या चर्चेला पेट घातली, आणि आता अनेकांच्या मनात उत्सुकता आहे – राजकारणी मंडळींच्या शिक्षणाचा खरा इतिहास काय?
देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर शाब्दिक हल्ला
शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे अमित ठाकरे हे दोघंही इंग्रजी माध्यमाच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलचे माजी विद्यार्थी. याचाच आधार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली – “भारतीय भाषांना विरोध आणि इंग्रजीला पायघड्या?”.
या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली की, नेतेमंडळींची शिक्षणं आणि त्यांचा भाषांबाबतचा दृष्टिकोन यात फरक आहे का?
नेत्यांची आणि त्यांच्या मुलांची शालेय यादी – एक नजर
उद्धव ठाकरे आणि कुटुंब
उद्धव ठाकरे – बालमोहन विद्यामंदिर, दादर
आदित्य ठाकरे – बॉम्बे स्कॉटिश स्कूल, माहिम
तेजस ठाकरे – बॉम्बे स्कॉटिश स्कूल → जय हिंद कॉलेज
राज ठाकरे कुटुंब
राज ठाकरे – बालमोहन विद्यामंदिर
अमित ठाकरे – आर.ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स
देवेंद्र फडणवीस कुटुंब
देवेंद्र फडणवीस – सरस्वती विद्यालय, नागपूर
दिविजा फडणवीस – कैथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल, मुंबई
एकनाथ शिंदे कुटुंब
एकनाथ शिंदे – ठाणे महानगरपालिका शाळा क्र. २३, किसननगर
डॉ. श्रीकांत शिंदे – मिथिला इंग्लिश हायस्कूल, ठाणे
शरद पवार आणि परिवार
शरद पवार – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, बारामती (थोडा काळ नगरमधे)
अजित पवार – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी → कोल्हापूर/मुंबई
सुप्रिया सुळे – सेंट कोलंबा स्कूल, मुंबई
इंग्रजी शिक्षणाचा राजकारणाशी संबंध?
नेत्यांची मुलं इंग्रजी शाळांमध्ये शिकतात यावरून अनेकदा आरोप होतात की, ते ‘भारतीय भाषांची कदर फक्त भाषणापुरती करतात’.
मात्र वास्तव हेही आहे की, आजच्या स्पर्धात्मक जगात इंग्रजी शिक्षण अनेक पालकांची पहिली पसंती असते – मग ते सामान्य नागरिक असोत वा मोठे राजकीय नेते.
भाषेवरून राजकारण – पण शिक्षणात प्रॅक्टिकल निवडी?
नेत्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली, हे समजणं औत्सुक्याचं नक्कीच आहे. पण यामधून एक गोष्ट स्पष्ट होते – इंग्रजी शिक्षण ही आजची गरज मानून अनेक राजकीय घराण्यांनी तसंच पाऊल उचललं आहे.
राजकारणात भाषा एक मुद्दा असतो, पण शिक्षणात पालक निवडतात गुणवत्तेचं माध्यम.
हे हि वाचा- शक्तीपीठ महामार्ग विरोध तापला! खासदारांवर गुन्हा दाखल
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!
1 thought on “राजकीय नेत्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली? संपूर्ण यादी येथे”