आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची संधी – 14 जून ही शेवटची तारीख!

अजूनही तुमचं आधार कार्ड मोफत अपडेटकेलं नाही? ही शेवटची संधी आहे! तुमच्या आधार कार्डातील माहिती अजूनही जुनीच आहे का? नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाइल नंबर चुकीचा आहे का? तर UIDAI कडून तुम्हाला मिळालेली ही ‘आधार कार्ड मोफत अपडेट’ करण्याची सुवर्णसंधी अजिबात गमावू नका! UIDAI ने नागरिकांना १४ जून २०२५ पर्यंत आधार अपडेट मोफत करण्याची सुविधा दिली आहे. यानंतर याच प्रक्रियेसाठी शुल्क आकारलं जाणार आहे.

आधार अपडेट का आवश्यक आहे?

आजही बऱ्याच नागरिकांच्या आधार कार्डामध्ये चुकीची किंवा जुनी माहिती असते – जसं की:

चुकीचं नाव किंवा स्पेलिंग,जुना पत्ता,बदललेला मोबाइल नंबर,अचूक नसलेली जन्मतारीख

या चुकांमुळे बँकेचे व्यवहार, सरकारी योजनांचा लाभ, शिष्यवृत्ती, सबसिडी, किंवा इतर सेवांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे वेळच्यावेळी आधार अपडेट करणं फार महत्त्वाचं आहे.

कोणती माहिती मोफत अपडेट करता येईल?

UIDAI नुसार, १४ जून २०२५ पर्यंत खालील गोष्टी ऑनलाइन मोफत अपडेट करता येतात:

नाव (फक्त एकदाच), पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक

मात्र, बायोमेट्रिक अपडेट (फोटो, फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन) साठी नजीकच्या आधार केंद्रात जावं लागेल आणि त्यासाठी शुल्क भरावं लागेल.

आधार कार्ड मोफत अपडेट प्रक्रिया

1. ऑनलाइन पद्धत (घरबसल्या)
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा

“Document Update” या पर्यायावर क्लिक करा

आधार नंबर व OTP टाकून लॉगिन करा

अपडेट करायची माहिती निवडा

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

सबमिट केल्यानंतर SRN क्रमांक मिळेल, त्याद्वारे अपडेट स्थिती पाहता येते

2. ऑफलाइन पद्धत (केंद्रावरून)

जवळच्या आधार सेवा केंद्रात भेट द्या

अपडेट/नोंदणी फॉर्म भरा

आवश्यक कागदपत्रं जोडून द्या

बायोमेट्रिक आवश्यकता असल्यास ती पूर्ण करा

आधी ही सुविधा १४ डिसेंबर २०२४ पर्यंत होती. पण आता UIDAI ने अंतिम मुदत १४ जून २०२५ पर्यंत वाढवली आहे.

आवश्यक कागदपत्रांची यादी

अपडेट करताना खालील दस्तऐवज आवश्यक असतील:

ओळखपत्राचा पुरावा (PoI): पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स

पत्त्याचा पुरावा (PoA): बँक पासबुक, विजेचं बिल, भाडेकरार, राशन कार्ड

जन्मतारीख (DoB): जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला

हे सर्व दस्तऐवज स्पष्ट, रंगीत आणि वैध असले पाहिजेत.

मोफत सुविधा संपल्यानंतर किती शुल्क लागेल?

जर तुम्ही १४ जून २०२५ पूर्वी अपडेट केलं नाही, तर पुढीलप्रमाणे शुल्क लागेल:

ऑनलाइन अपडेटसाठी ₹२५

केंद्रावरून अपडेटसाठी ₹५०

UIDAI ने दिलेली ही आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम संधी आहे. नागरिकांनी वेळ न दवडता आजच आपलं आधार अपडेट करावं आणि भविष्यातील कोणतेही व्यवहार अडथळ्याशिवाय पार पाडावेत.

हे हि वाचा : What is Hallmarking:हॉलमार्किंग म्हणजे काय? सोन्याची शुद्धता कशी ओळखावी ते समजून घ्या

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

2 thoughts on “आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची संधी – 14 जून ही शेवटची तारीख!”

Leave a Comment