बंगळुरू चेंगराचेंगरी (Bengaluru Stampede) प्रकरणी विराट कोहलीच्या मित्र व RCB मार्केटिंग हेड निखिल सोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांचा मोठा कारवाईचा निर्णय.
विजयी रॅलीचा दुर्दैवी शेवट : ११ जणांचा बळी, कोहलीच्या मित्रासह ३ जण अटकेत!
बंगळुरू शहरात नुकतीच RCB संघाच्या विजयाची रॅली निघाली, मात्र या आनंदसोहळ्याचे रूप काही क्षणातच शोकांतिका घडवणाऱ्या घटनेत बदलले. बंगळुरू चेंगराचेंगरी त ११ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता पोलिसांनी मोठी कारवाई करत विराट कोहलीच्या जवळच्या मित्राला अटक केली आहे.
RCB च्या रॅलीदरम्यान मोठी चेंगराचेंगरी
IPL 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा पराभव करत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. दुसऱ्या दिवशी टीमच्या सन्मानार्थ बंगळुरू शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. मात्र गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत.
बंगळुरू चेंगराचेंगरी (Bengaluru Stampede) कोण आहेत जबाबदार?
या प्रकरणात पोलिसांनी RCB संघाच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख निखिल सोसले याला अटक केली आहे. निखिलला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. त्याच्यासह आणखी दोन आयोजकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बंगळुरू चेंगराचेंगरी (Bengaluru Stampede) प्रकरणी पोलिसांनी केला मोठा खुलासा
ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, बंगळुरू पोलिसांनी आपल्या FIR मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की, RCB व्यवस्थापन, स्टेडियम प्रशासन व आयोजकांनी परवानगीशिवाय स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला. परिणामी प्रचंड गर्दी जमली आणि काही क्षणातच स्थिती हाताबाहेर गेली.
निखिल सोसले : केवळ मार्केटिंग हेड नव्हे, तर RCB च्या यशामागचा चेहरा
निखिल सोसले हा RCB फ्रेंचायझीमध्ये बिझनेस पार्टनरशिप, मार्केटिंग व रेव्हेन्यू डेव्हलपमेंट या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर कार्यरत आहे. संघाच्या ब्रँडिंगमागे त्याचे मोठे योगदान असून, IPL मधील RCB चे आंतरराष्ट्रीय ब्रँडमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याने काही रणनीती आखल्या होत्या.
निखिलची पत्नी आहे अनुष्का शर्माची जिवलग मैत्रीण
निखिलची पत्नी मालविका नायक हिचे नावही चर्चेत आलं आहे. ती बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची खूप जवळची मैत्रीण असून, दोघी अनेकदा स्टँडमध्ये एकत्र बसून RCB चे सामने पाहताना दिसल्या आहेत. मालविकाने Manipal Academy of Higher Education येथून शिक्षण घेतलं असून, सध्या ती एका स्टार्टअप कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.
जबाबदारीची किंमत?
बंगळुरूतील चेंगराचेंगरी ने RCB च्या विजयावर शोककळा पसरली आहे. आनंदाच्या वातावरणात घडलेली ही दुर्घटना संपूर्ण देशभर चर्चेचा विषय बनली आहे. यामध्ये अटक झालेल्या व्यक्तींमध्ये विराट कोहलीचा जवळचा मित्र असल्याने, ही घटना आणखीच गाजत आहे.
आणखी वाचा : RCB विजय रॅली भगदड: ११ मृत, BCCI आणि IPLनं जबाबदारी झटकली
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!