एकनाथ शिंदेंनी शहांकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली?

“मला मुख्यमंत्री करा, म्हणजे सगळं आटोक्यात येईल!” — असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट अमित शहांकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने झालेली ही दिल्ली भेट म्हणजे निव्वळ औपचारिकता नसून, मोठ्या राजकीय चर्चेचा भाग होती, असं राऊतांनी स्पष्ट केलं. या कथित गुप्तगोष्टीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या उलथापालथीची शक्यता निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदें यांच्या दिल्ली दौऱ्याचा खरा हेतू काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच केलेल्या दिल्ली दौऱ्याला गुरूपौर्णिमेचं निमित्त दिलं गेलं. पण उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यामागे वेगळाच अर्थ लावला आहे.
“गुरू भेटायला गेले होते की मुख्यमंत्रीपद मागायला?” असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदें -शहा गुप्तगू : मुख्यमंत्रीपदावर चर्चा?

राऊतांच्या दाव्यानुसार, एकनाथ शिंदें आणि शहा यांच्यात झालेल्या चर्चेचा केंद्रबिंदू होता – महाराष्ट्रात मराठी माणसांची वाढती एकजूट. या एकजुटीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसू शकतो, अशी भीती शिंदेंनी व्यक्त केली आणि उपाय म्हणून स्वतःच मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’ समोर ठेवली.
राऊत म्हणाले, “शिंदेंनी शहा यांना सांगितलं – मला मुख्यमंत्री करा, म्हणजे सगळं आटोक्यात येईल.”

एकनाथ शिंदे यांना भाजपात विलीन होण्याचा प्रस्ताव?

संजय राऊतांचा आणखी एक मोठा दावा म्हणजे –एकनाथ शिंदें गट भाजपात विलीन होण्यासाठी तयार आहे. यासाठी त्यांनी सशर्त तयारी दर्शवली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र शहा यांनी “मुख्यमंत्री भाजपाचाच असेल” हे स्पष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.

फडणवीसांविरोधात तक्रार?

दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदें यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार केल्याची खोचक टीका राऊतांनी केली. “ते आम्हाला अडचणीत टाकतात, काम करू देत नाहीत” असं सांगत शिंदेंनी भाजपमधील अंतर्गत वाद अधोरेखित केला.

ईडी नोटीसा आणि ‘संरक्षकांची’ कमकुवतता

शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री संजय शिरसाट यांना ईडीच्या नोटिसांबाबतची चर्चा नुकतीच रंगली. त्यावर राऊतांनी म्हटलं – “हे तर फक्त सुरुवात आहे. लवकरच आणखी मोठी कारवाई होणार आहे.”
दिल्लीतील शिंदेंच्या पाठीशी उभ्या असलेल्या शक्ती आता कमकुवत होत चालल्याचा आणि त्यामुळे तपास यंत्रणा सक्रिय होत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

सत्तेचा खेळ अजून रंगायचा आहे!

संजय राऊतांनी उघड केलेल्या या कथित चर्चेमुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा गरम झालं आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न आणि दुसरीकडे भाजपाचा स्पष्ट नकार – यामुळे आगामी दिवसांत राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या राजकीय बातम्या आणि विश्लेषणासाठी आमचं न्यूज ब्लॉग फॉलो करा. महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या वळणावर जाईल, यावर लक्ष ठेवा!

आणखी वाचा: “टेनिस स्टार राधिका यादवची निर्घृण हत्या – घरातच वडिलांचा गोळीबार

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Subscribe

1 thought on “एकनाथ शिंदेंनी शहांकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली?”

Leave a Comment