Gold Price: “ऑपरेशन सिंदूर” नंतर सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ, दर थेट एक लाखाच्या पुढे.

Gold Price Crossed One Lakh Rupees: भारत-पाकिस्तानमधील तणावाचा परिणाम शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला, मात्र अशा परिस्थितीतही सोन्याची किंमत मात्र सतत वाढतच राहिली. नुकतंच सोनं एक लाख रुपयांच्या वर गेलं आहे. याआधीही, 23 एप्रिलला, म्हणजेच पहलगाम हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दराने एक लाखाची मर्यादा ओलांडली होती.

 

Gold Price Crossed One Lakh Rupees: 22 एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. या घटनेनंतर भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला केला आणि अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरनं या कारवाईत आपल्या कुटुंबातील 10 सदस्य गमावल्याचं मान्य केलं आहे. या घडामोडींनंतर पाकिस्तानचा शेअर बाजार घसरला, तर भारतीय बाजारात थोडीशी घसरण झाल्यानंतर स्थिरता आली. याच काळात सोन्याच्या किमतीनं उंच उडी घेतली आणि दर थेट एक लाखाच्या वर पोहोचला.

 

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उधळपट्टी झाली असून, किंमती 1 लाख रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. 23 एप्रिलला, पहलगाम हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशीही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोनं हे गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय मानलं जातं, त्यामुळेच लोक त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

Gold Price:सोन्याने पुन्हा एकदा एक लाखाची मर्यादा ओलांडली…

बुधवारी भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली, आणि त्याचा तात्काळ परिणाम बाजारात दिसून आला. विशेषतः सोन्याच्या किमतींनी झपाट्याने वाढ घेतली. दिल्लीत बुधवारी सोन्याचा भाव तब्बल 1,000 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1 लाखाच्या पुढे गेला. इंडियन बुलियन असोसिएशननुसार, मंगळवारी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 99,750 रुपये होता, जो बुधवारी वाढून 1,00,770 रुपयांवर पोहोचला.

बुधवारी 99.5 टक्के शुद्ध सोन्याच्या किमतीत 1.50 रुपयांची वाढ झाली आणि त्याची किंमत 1,00,350 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचली. यापूर्वी, 22 एप्रिलला सोन्याच्या किमतीत 1,800 रुपयांची मोठी वाढ झाली होती, ज्यामुळे सोन्याने ऐतिहासिक विक्रम गाठत 1,01,600 रुपये प्रति दहा ग्रॅमवर व्यवहार केला होता.

Gold Price:आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोनं कमी किमतीत उपलब्ध.

गेल्या महिन्यात अक्षय्य तृतीया होती, ज्यादिवशी भारतात सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी कायम ठेवली गेली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बुधवारी आणि त्यापूर्वी सलग तीन दिवस सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने त्याची किंमत सुमारे 5 हजार रुपयांनी वाढली आहे. पण, आंतरराष्ट्रीय बाजाराच्या बाबतीत बोलायचं झालं, तर सोनं स्वस्त झालं आहे. इंटरनॅशनल सोन्याचे दर येथे पहा. आंतरराष्ट्रीय बाजारात  सोन्याच्या किमतीत कमी होण्याचं कारण म्हणजे अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संबंधातील तणाव कमी झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

 

 

Leave a Comment