भारताच्या Operation Sindoor नंतर इंटरनेटवर खळबळ.

६ मे २०२५ च्या रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या ठिकाणावर जोरदार Air Strike केली. या कारवाईचं नाव ठेवलं गेलं – “ऑपरेशन सिंदूर” (Operation Sindoor). ही कारवाई आतंकवाद्यांच्या ठिकाणावर केंद्रित होती.
आणि भारतीय वायुदलाने ती अचूकतेने पार पाडली. या कारवाईने संपूर्ण देशात देशभक्तीची लहर उसळली,पहलगाम येते पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून या Air Strike कडे बघितले जात आहे तर दुसरीकडे इंटरनेटवर एक वेगळीच चर्चा सुरू झाली — ‘OperationSindoor.com’ या डोमेनच्या किंमतीबद्दल.

GoDaddy वर ‘OperationSindoor.com’ च्या किमतीमुळे इंटरनेटवर खळबळ!

  Operation Sindoor या नावाची चर्चा सुरु झाल्यानंतर अनेक जणांनी उत्सुकतेने GoDaddy, Namecheap, आणि इतर डोमेन विक्रेत्यांच्या वेबसाईटवर जाऊन OperationSindoor.com हे डोमेन उपलब्ध आहे का, आणि तिची किंमत किती आहे, हे तपासायला सुरुवात केली. GoDaddy वर तपासल्यावर असे आढळून आले की या डोमेनसाठी सध्याची अंदाजित किंमत ₹१६९ कोटीं हून अधिक आहे.
ही आकडेवारी पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं , कारण ही किंमत केवळ नावाची नाही, तर त्या नावाशी जोडलेल्या देशभक्तीच्या आणि सांस्कृतिक भावना यांची आहे.

हे डोमेन इतकं महाग का?

Operation Sindoor (ऑपरेशन सिंदूर) हे नाव एका ऐतिहासिक कारवाईस जोडले गेले आहे. हे नाव भावनिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय पातळीवर लोकांच्या मनात घर करत आहे.त्यामुळे या ऑपेरेशन चे नाव गाजले.

भविष्यातील ब्रँड व्हॅल्यू: भविष्यात या नावावर आधारित वेबसाइट, डॉक्युमेंटरी, माहिती केंद्र, न्यूज पोर्टल किंवा ई-बुक्स तयार होऊ शकतात. त्यामुळे त्याची डिजिटल मागणी प्रचंड आहे.

भावनिक जोड: ‘सिंदूर’ या शब्दाचा भारतीय संस्कृतीत खास अर्थ आहे — सन्मान, बलिदान आणि निष्ठा. या सांस्कृतिक अर्थामुळे हे नाव अधिकच प्रभावशाली ठरलं आहे.

डोमेन आणि डिजिटल मूल्य.
“OperationSindoor.com” हे उदाहरण दाखवून देतं की डिजिटल युगात एखाद्या शब्दाची किंवा नावाची किती मोठी आर्थिक किंमत असू शकते — विशेषतः जेव्हा ते नाव भावनांशी, इतिहासाशी आणि देशभक्तीशी जोडलेलं असतं.

Operation Sindoor (ऑपरेशन सिंदूर) – लष्करी कारवाई पलिकडचं एक विधान.

या ऑपरेशनच्या नावामागे केवळ सामरिक हेतू नव्हता, तर भारतीय संस्कृतीतील एक शक्तिशाली प्रतीक वापरलं गेलं. ‘सिंदूर’ हे विवाहाच्या आणि स्त्रीच्या सन्मानाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे ही कारवाई म्हणजे देशासाठी केलेला एक सांस्कृतिक व सामरिक प्रणय आहे असंही म्हणता येईल.

 Operation Sindoor (ऑपरेशन सिंदूर) ही कारवाई भारताच्या सामरिक इतिहासातील एक माईलस्टोन आहे. पण त्याचसोबत, याच नावानं इंटरनेटवर ज्या प्रकारे आपली जागा निर्माण केली आहे, ते पाहून स्पष्ट होतं की आजचं युद्ध केवळ रणांगणावर नाही, तर डिजिटल जगातही लढलं जातंय.

‘OperationSindoor.com’ या डोमेनची किंमत केवळ आर्थिक नाही – ती भावनिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय मूल्याने भरलेली आहे.

Leave a Comment