मनोज जरांगे पाटील यांचा इशारा: कागदपत्रं अडवली तर मंत्रालय घेरू

Siddhi News: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला पुन्हा एकदा जोरदार चालना दिली आहे. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यात ते सरकारवर थेट तुटून पडले. “कागदपत्रं अडवली, तर मंत्रालय घेरू,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. हे आंदोलन आता निर्णायक वळणावर आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी नवा एल्गार

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांत आपला लढा अधिक तीव्र केला आहे. अनेकदा उपोषण, सभा आणि आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

नुकत्याच झालेल्या आंतरवली सराटी येथील राज्यस्तरीय बैठकीत त्यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. हे आंदोलन निर्णायक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“आता कोणीही मराठ्यांना रोखू शकत नाही. अंतिम लढाई आहे, आरपारची लढाई!” — मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

धाराशिव जिल्ह्यातील ‘कार’ या गावात झालेल्या बैठकीत बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारला थेट शब्दांत इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केलं की, जर मराठा समाजाची कागदपत्रं मुद्दाम अडवण्यात आली, तर हे सरकारसाठी शहाणपणाचं ठरणार नाही.

“कागदपत्रं अडवली तर शासकीय कार्यालयांना घेराव घालू. आमच्या लेकरांचं नुकसान सहन करणार नाही.” — मनोज जरांगे पाटील

त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही टीका केली. “कुणबी प्रमाणपत्रं देऊ नयेत म्हणून शिरसाट अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

मोर्चाचा मार्ग आणि तयारी

मोर्चा प्रस्थान: 27 ऑगस्ट, आंतरवली सराटी
मुंबईत आगमन: 29 ऑगस्ट

मुख्य मार्ग:
शहागड → पैठण → शेवगाव → पांढरीपूल → अहिल्यानगर → नेप्टी नाका → आळेफाटा → माळशेज घाट → कल्याण → वाशी → चेंबूर → मंत्राल

पर्यायी मार्ग:
पैठण → गंगापूर → वैजापूर → येवला → नाशिक → मुंबई

या मोर्चासाठी राज्यभरातून मराठा बांधव एकत्र येणार असून, प्रत्येक टप्प्यावर चावडी बैठका घेत आंदोलनाची तयारी केली जात आहे.

आरक्षणाचा लढा निर्णायक वळणावर

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यात दाखल होत आहे. सरकारने जर योग्य निर्णय घेतला नाही, तर 29 ऑगस्टचा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.

मराठा आरक्षणाच्या या ऐतिहासिक लढ्याची अपडेट्स, मार्ग व बैठकींची माहिती मिळवत राहण्यासाठी आमच्या न्यूज ब्लॉगला फॉलो करा!

हे हि वाचा: तुकडेबंदी कायदा रद्द होणार ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Subscribe

1 thought on “मनोज जरांगे पाटील यांचा इशारा: कागदपत्रं अडवली तर मंत्रालय घेरू”

Leave a Comment