Siddhi News: नागपूरच्या विधानभवनाचा चेहरा बदलणार – भव्य विस्तारीकरणाची दिशा स्पष्ट, नागपूर शहराच्या राजकीय हृदयस्थानी उभं असलेलं विधानभवन लवकरच अधिक भव्य, सुसज्ज आणि आधुनिक स्वरूपात दिसणार आहे.
नागपूर विधानभवन विस्तारीकरणाचे आराखडे उघड
नागपूरच्या विधानभवन परिसराच्या विस्तारीकरणासाठी नव्या प्रशासकीय इमारतीचा आराखडा नुकताच सादर करण्यात आला. हा संपूर्ण प्रकल्प इतका भव्यदिव्य असेल की त्यातून केवळ राजकारणाचं नाही, तर महाराष्ट्राच्या आधुनिक स्थापत्यशास्त्राचं दर्शनही होईल.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या प्रसंगी सांगितलं, “ही इमारत केवळ प्रशासकीय गरजा पूर्ण करणार नाही, तर नागपूरचं मानचिन्ह ठरेल.”
राज्याच्या टॉप नेतृत्वाची उपस्थिती
या ऐतिहासिक सादरीकरणाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले उपस्थित होते.
प्रसिद्ध वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी विस्तृत आराखडे सादर केले.
काय असणार नवीन इमारतीत?
सात मजली नवीन संकुल – सेंट्रल हॉल, विधानसभा, विधानपरिषद सभागृह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे दालन.
सहा मजली स्वतंत्र इमारत – सर्व मंत्रिमंडळ सदस्यांसाठी.
नवीन चौदा मजली प्रशासकीय इमारत – ४ लाख चौ. फूट क्षेत्रफळ.
उपहारगृह, अभ्यागत कक्ष, सुरक्षा विभाग, वाहनतळ – सर्व सुविधा एकत्र.
सर्व इमारती भुयारी टनेलने जोडल्या जाणार आहेत, जेणेकरून आतल्या हालचाली अधिक सुलभ होतील.
नागपूर विधानभवन हरित इमारती ची संकल्पना
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं की, “ही इमारत पर्यावरणपूरक असावी, अभ्यागतांसाठी पुरेशी जागा आणि उपहारगृहाची सुविधा आवश्यक आहे.”
ही संपूर्ण योजना ‘ग्रीन बिल्डिंग’ (Harit Imarat) संकल्पनेवर आधारित असेल – ऊर्जा कार्यक्षमतेचा आदर्श ठरेल.
नागपूर विधानभवन विस्तारीकरण प्रकल्प कोण राबवणार?
या विस्तारीकरण योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. यासाठी सविस्तर प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार आहे.
नागपूर विधानभवन विस्तारीकरण” हा प्रकल्प केवळ नवीन इमारतींचं बांधकाम नाही, तर महाराष्ट्राच्या लोकशाही प्रक्रियेसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
अशाच महत्त्वाच्या स्थानिक घडामोडींसाठी आमचा न्यूज ब्लॉग नक्की वाचा आणि शेअर करा!
वाचा: जमीन अधिग्रहण: सरकार बिना परवानगी जमीन कशी घेऊ शकते? जाणून घ्या हक्क!
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!
