Virat Kohli 10वी मार्कशीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच तेजस्वी असणाऱ्या विराटच्या दहावीच्या गुणपत्रिकेने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. इंग्रजी, हिंदीसह गणितातील गुण पाहून काहीजण थक्क झाले, तर काहींनी त्याच्या समर्पणाची प्रशंसा केली आहे. चला, पाहूया त्याच्या शालेय जीवनाचा हा खास झलक.
Virat Kohli 10वी मार्कशीटने सोशल मीडियावर धुमाकूळ
भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली केवळ क्रिकेटमध्येच नव्हे, तर शाळेतही आपल्या कामगिरीसाठी ओळखला जात होता हे आता समोर येत आहे. सध्या त्याची 10वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यातील विषयानुसार गुण पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
क्रिकेट स्टारची अभ्यासू बाजू
विराट कोहली नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि अध्यात्मिक प्रवासामुळे चर्चेत असतो. पण यावेळी चर्चेचा विषय आहे त्याचे शालेय जीवन. त्याच्या शाळेतील गुण पाहता, तो केवळ खेळात नव्हे तर अभ्यासातही सरस होता असे दिसून येते.
आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये दिसणार विराट
अलीकडेच विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सध्या तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या शालेय काळातील आठवणी अधिक भावस्पर्शी ठरत आहेत.
अभ्यासातील यशाची झलक
विराटने अगदी लहान वयातच क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. अकरावीपर्यंत त्याचे शिक्षण झाले असून त्यानंतर त्याने पूर्णवेळ क्रिकेटला वाहून घेतले. मात्र, दहावीत त्याने मिळवलेले गुण पाहता त्याची अभ्यासातील समर्पणही स्पष्ट होते.
गणितात 51 गुण; चाहते म्हणतात “गुण नसतात सर्वकाही
व्हायरल Virat Kohli 10वी मार्कशीट नुसार, विराटला इंग्रजीत 83, हिंदीत 75, सामाजिक शास्त्रात 81, IT मध्ये 74 आणि गणितात 51 गुण मिळाले होते. गणितातील तुलनेने कमी गुणांवर काही चाहते गंमतीने प्रतिक्रिया देत आहेत, तर काहींनी म्हटलं की, “गुण पेक्षा मेहनत मोठी असते.”
विराट कोहली टेस्ट क्रिकेट निवृत्ती कारण काय ? जरूर वाचा
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!
1 thought on “Virat Kohli 10वी मार्कशीट व्हायरल; गणितातील गुण पाहून चाहते झाले थक्क”