शिवसेना-मनसे युतीवर उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत – महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, तेच लवकरच सत्यात उतरेल, असा ठाम विश्वास!
उद्धव ठाकरे यांचं स्पष्ट संकेत: आता वेळ आहे थेट बातमीची!
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा भडका उडालाय. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वाक्याने अनेक चर्चांना चालना दिली आहे – “जे महाराष्ट्राच्या मनात आहे, ते लवकरच होणार!” त्यांनी स्पष्ट केलं की, आता केवळ संकेत नव्हे तर थेट बातमीच देणार.
शिवसेना-मनसे युतीवर राजकीय घडामोडी सुरूच
गेल्या काही आठवड्यांपासून शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू आहे. अद्याप अधिकृतरित्या कुठलाही प्रस्ताव पुढे आला नसला तरी, दोन्ही पक्षांतर्गत हालचाली पाहता एक सकारात्मक संदेश नक्कीच दिसतोय.
उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्ट संकेत
एका पत्रकार परिषदेत उद्धव जी म्हणाले की, “शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे लवकरच प्रत्यक्षात उतरेल. आता फक्त बातमीच उरेल.”
या विधानामुळे, दोन्ही पक्षांची युती जवळपास अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मनसेचा आधीचा सावध पवित्रा
याआधी मनसे नेत्यांनी जाहीर केलं होतं की, “युतीची चर्चा ही कॅमेऱ्यासमोर होत नाही, योग्य तो प्रस्ताव समोर आला की विचार केला जाईल.” 2014 आणि 2017 मध्ये अशाच चर्चांनी कोणताही निष्कर्ष न काढल्यामुळे, या वेळेस मनसे “ताक फुंकून पिण्याचा” दृष्टिकोन ठेवते आहे.
शिवसेना-मनसे युती: पुढचं पाऊल?
उद्धव ठाकरेंचं विधान फक्त राजकीय भाष्य नसून, शिवसेना-मनसे युतीसाठी दिलेला महत्त्वाचा इशारा असू शकतो. दोन्ही पक्षांमध्ये समानतेचे मुद्दे, मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा असल्याने, हाच एक नवीन राजकीय फॉर्म्युला बनू शकतो.
आता नजर ठेवा “बातमीवर”!
सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे स्पष्ट संकेत मिळतो की, काहीतरी मोठं आणि निर्णायक घडणार आहे. आता प्रश्न असा उरतो – ही “बातमी” कधी आणि काय असेल?
हे हि वाचा :सांगली जिल्ह्यातील गावांची नावे बदलण्याची मागणी; आमदार गोपीचंद पडळकरांचा ठाम आग्रह
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!