Vaishnavi Hagwane Case: पिस्तूल परवाना घेताना हगवणे बंधूंनी लपवली ‘ही’ महत्त्वाची बाब; चौकशीत धक्कादायक खुलासे

Siddhi News पुणे :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagwane Case) अटकेत असलेल्या शशांक आणि सुशील हगवणे या बंधूंना आणखी अडचणीत आणणारी माहिती समोर आली आहे. त्यांनी पिस्तूल परवाना घेताना रहिवासासंबंधी खोटी माहिती दिल्याचे उघड झाले असून, या प्रकरणात पोलीस अधिक चौकशी करत आहेत. त्याचबरोबर नवे गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vaishnavi Hagwane Case: बनावट माहितीवर पिस्तूल परवाने?

शशांक आणि सुशील हगवणे या दोघांनी 2022 मध्ये पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वास्तव्य असल्याचे दाखवले होते. मात्र चौकशीत हे समोर आले की त्यांचा कायमस्वरूपी पत्ता पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून, त्यांनी पुण्यातील भाडेकरार दाखवून परवाना मिळवला होता. याशिवाय, त्यांचा एक नातेवाईक त्याकाळात पुणे पोलिस दलात कार्यरत होता, ज्यामुळे या परवाने मंजूर होण्यामागे प्रशासकीय हस्तक्षेप झाल्याचीही शक्यता तपासली जात आहे.

एकाच दिवशी तीन परवाने

Vaishnavi Hagwane Case या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे 2022 मध्ये शशांक, सुशील हगवणे आणि नीलेश चव्हाण – या तिघांना एकाच दिवशी पिस्तूल परवाने दिले गेले होते. हे तिन्ही परवाने पुणे पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून मंजूर झाले. यावरूनच प्रश्न उपस्थित होतो की, तिघांना एकाच वेळी शस्त्र परवान्याची गरज का वाटली? आणि परवाने देताना प्रशासनाने योग्य ती चौकशी केली होती का?

परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

पोलीस विभागाने सदर तिघांचे पिस्तूल जप्त केले असून, त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यात वास्तव्याचा खोटा पुरावा देऊन पोलिसांना दिशाभूल केल्याप्रकरणी हगवणे बंधूंविरुद्ध नवीन फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आयपीएस अधिकाऱ्यांच्या निर्णय प्रक्रियेत कोणती त्रुटी राहिली होती का, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

कायदेशीर गुंतागुंत वाढणार?

हा संपूर्ण प्रकार वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणाशी (Vaishnavi Hagwane Case) थेट जोडलेला नसला, तरी तो हगवणे बंधूंच्या कायदेशीर अडचणी निश्चितच वाढवणारा ठरतो आहे. त्यांच्यावरील संशय बळावण्याची शक्यता असून, पोलिसांची तपासाची व्याप्ती अधिक व्यापक झाली आहे.

हगवणे बंधूंनी शस्त्र परवाना मिळवताना दिलेली चुकीची माहिती आता त्यांच्या गळ्यात अडकल्यासारखी झाली आहे. यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला असून, या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

2 thoughts on “Vaishnavi Hagwane Case: पिस्तूल परवाना घेताना हगवणे बंधूंनी लपवली ‘ही’ महत्त्वाची बाब; चौकशीत धक्कादायक खुलासे”

Leave a Comment