यूट्युबर ज्योती मल्होत्राला अटक: हिसार (हरियाणा) मधील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.
हरियाणातील ब्लॉगरवर हेरगिरीचा आरोप, अटक
हिसार (हरियाणा) येथील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. ती २०२३ मध्ये दोन वेळा पाकिस्तान दौऱ्यावरगेली होती. तिथे तिचे पाकिस्तानमधील काही गुप्तहेर लोकांशी संबंध आले होते आणि त्या मुळे तिचा भारतासाठी धोका निर्माण होऊ शकतो, असा गंभीर आरोप आहे.
दोन पाकिस्तान दौरे, अनेक गुप्त भेटी – एफआयआरमध्ये मोठे खुलासे
यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हि सोशल मिडियावर तिच्या ट्रॅव्हल व्लॉगसाठी ती खूप प्रसिद्ध आहे.आणि ती “ट्रॅव्हल विथ जो” या प्रसिद्ध यूट्यूब चॅनेलची मालक आहे, मात्र, तिच्या २०२३ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेल्यानंतर तिच्या कारवायांवर संशय निर्माण झाला. एफआयआरनुसार, ज्योतीने पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचारी दानिश उर्फ एहसान-उर-रहीम आणि इतर गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. या व्यक्तींनी तिला पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणांसोबत ओळख करून दिली.
तपास अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या माहितीनुसार…
FIR मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, “ज्योतीने पाकिस्तान दौऱ्यावर असताना, पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला होता आणि भारतीय स्थानांविषयी संवेदनशीलआणि गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवली.” ती Whatsapp, Telegram आणि Snapchat सारख्या अॅप्सवर गुप्तपणे संपर्क साधत होती. त्यावरून ती आणि पाकिस्तानमधील गुप्तहेर एजंट्स यांच्यात घनिष्ठ संबंध होते आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे, त्यामुळे यूट्युबर ज्योती मल्होत्राला अटक केले आहे. असं तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.
यूट्यूबर ज्योती मल्होत्रा वर अधिकृत गुप्त माहिती कायदा, 1923 आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.आणि तपास यंत्रणा तिच्या संपर्कांबाबत अधिक माहिती गोळा करत आहेत.
पाकिस्तानशी संपर्क आणि सोशल मीडिया वापर
यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ने, पाकिस्तान दौऱ्यांमध्ये गुप्त कार्यवाहीत भाग घेत होत होती . ती सोशल मीडियाचा वापर करून पाकिस्तानची बाजू मांडत होती आणि पाकिस्तानच्या दृष्टीकोनातून सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. तिचे हे कार्य देशाच्या सुरक्षा दृष्टीने अत्यंत गंभीर ठरू शकते.
ह्या घटनेतून असे लक्षात येते की, सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लेटफॉर्म्सवर ज्या प्रकारे व्यक्ती आपली माहिती शेअर करतात, त्याला किती धोका असू शकतो. ज्योती मल्होत्रा यापूर्वी प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून ओळखली जात होती, पण आता तिचा पाकिस्तानशी असलेला संपर्क आणि गुप्त माहिती पुरवण्याचे आरोप आणि आता यूट्युबर ज्योती मल्होत्राला अटक या गंभीर मुद्यावर सद्या देशभर चर्चा होत आहे.