What is Hallmarking:हॉलमार्किंग म्हणजे काय? सोन्याची शुद्धता कशी ओळखावी ते समजून घ्या

भारतात सोनं खरेदी करणं ही केवळ गुंतवणूक नाही, तर एक संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा भाग आहे. प्रत्येक सण, व्रत-वैकल्यापासून ते लग्नकार्यापर्यंत प्रत्येक शुभ प्रसंगी सोन्याची खरेदी ही अपरिहार्य मानली जाते.

मात्र सोनं खरेदी करताना त्याची शुद्धता अत्यंत महत्त्वाची असते. ग्राहकांना सोने खरेदी करताना दर्जेदार आणि शुद्ध सोनं मिळावं यासाठी भारत सरकारने २००० साली BIS (Bureau of Indian Standards) या संस्थेच्या माध्यमातून हॉलमार्किंग ही प्रणाली सुरू केली. पण भारतात अजून हि बहुतांशी लोकांना हॉलमार्किंग म्हणजे काय? (What Is Hallmarking?) हे माहित नाही.

या लेखात आपण ‘हॉलमार्किंग म्हणजे काय? (What is Hallmarking?) ती प्रक्रिया कशी असते, तिचे फायदे आणि ग्राहकांनी काय काळजी घ्यावी – हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

What Is Hallmarking

 

हॉलमार्किंग म्हणजे काय? (What Is Hallmarking?)

हॉलमार्किंग म्हणजे काय? याचं सोपं उत्तर असं देता येईल की, सोनं, चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या वस्तूंमध्ये त्या धातूचं किती शुद्ध प्रमाण आहे, हे अधिकृतरित्या तपासून त्यावर शिक्का (Stamp) मारणं म्हणजेच हॉलमार्किंग. शुद्धतेचा एक सरकारी मान्य मापदंड.

हॉलमार्किंग म्हणजे काय? तर त्या वस्तूची शुद्धता पक्की असल्याची खात्री – सरकारमान्य अशी मोहर. म्हणजे तुम्ही जसं एखादं शासकीय प्रमाणपत्र मानता, तसं काहीसं हे हॉलमार्किंगचं प्रमाणपत्र असतं, जे तुम्हाला सांगतं की हे सोनं/चांदी खरंच इतकं शुद्ध आहे.

हॉलमार्किंग म्हणजे त्या दागिन्याची शुद्धता खात्रीशीर आहे याचं अधिकृत प्रमाणपत्रच मानलं जातं — अगदी जसं शासकीय प्रमाणपत्र असतं, तसंच!

हे हॉलमार्किंग म्हणजे काय? तुम्हाला सांगतं की हे सोनं किंवा चांदी इतकं टक्के शुद्ध आहे आणि ते BIS (भारतीय मानक ब्युरो) द्वारे प्रमाणित आहे.

What Is Hallmarking

हॉलमार्किंग प्रक्रिया कोण करते? (The Hallmarking Process)

हॉलमार्किंग म्हणजे काय? (What Is Hallmarking?) हे समजून घेतल्यानंतर आता आपण हॉलमार्किंग प्रक्रिया कोण करते? (The Hallmarking Process) हे समजुन घेऊया.

सोनं खरेदी करताना त्याच शुद्ध असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. पण, आपण ज्या दुकानातून दागिने घेतो, तिथलं सोनं खरंच शुद्ध आहे की नाही, हे आपल्याला कसं कळणार? त्यासाठी आपण हॉलमार्किंगची प्रक्रिया सोप्या शब्दात थोडक्यात समजून घेऊया.

हॉलमार्किंगची अधिकृत प्रक्रिया ही BIS (Bureau of Indian Standards) मान्यताप्राप्त (Assaying & Hallmarking Centres – AHC) हॉलमार्किंग केंद्रांद्वारे केली जाते. जेव्हा ज्वेलर्स आपले तयार झालेले दागिने गुणवत्ता तपासणीसाठी पाठवतात, तेव्हा ही प्रक्रिया सुरु होते

प्रथम, हॉलमार्किंग केंद्रात त्या दागिन्यांची XRF मशीनद्वारे (X-ray fluorescence) प्राथमिक तपासणी केली जाते. त्यानंतर, दागिन्यातून एक नमुना (sample) घेतला जातो आणि लॅबमध्ये त्याचे असायिंग (Assaying) — म्हणजेच शुद्धतेची विश्लेषणात्मक तपासणी केली जाते.
उदाहरणार्थ, जसे पाण्याची शुद्धता मोजण्यासाठी त्याचे परीक्षण केले जाते, त्याचप्रमाणे सोन्याचे Assaying केले जाते.

जर दागिना ज्वेलर्सने घोषित केलेल्या कॅरेट प्रमाणानुसार (उदा. 22K 916) योग्य आढळला, तर त्या दागिन्यावर पुढील तीन गोष्टींचा शिक्का (Stamp/Mark) मारला जातो:

BIS चा अधिकृत लोगो

कॅरेटची माहिती (उदा. 22K916)

HUID कोड (Hallmark Unique Identification Code)

त्यानंतर हे सर्व दागिने ज्वेलर्सकडे परत पाठवले जातात.

मानकऑनलाईन या अधिकृत वेबसाईट वर हॉलमार्किंग सेंटर चा सर्व लेख जोखा असतो.

What Is Hallmarking

BIS म्हणजे काय? – What is BIS Certification?

BIS (Bureau of Indian Standards) ही भारत सरकारची एक अधिकृत संस्था आहे, जी उत्पादनांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणपत्र (Certification) देते.

BIS ची स्थापना 1987 साली झाली.

ही संस्था ISI मार्क आणि हॉलमार्क यांसारख्या प्रमाणनांद्वारे वस्तूंची शासकीय दर्जाची खात्री देते.

सोनं, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अन्नपदार्थ अशा विविध क्षेत्रांमध्ये BIS प्रमाणपत्र आवश्यक असते.

BIS प्रमाणपत्रामुळे ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार उत्पादने मिळतात.

भारत सरकारने हॉलमार्किंग म्हणजे काय? (What Is Hallmarking?) हे समजावून देण्यासाठी BIS च्या माध्यमातून एक विश्वासार्ह प्रणाली तयार केली आहे.

कोणत्या कॅरेटच्या सोन्याला हॉलमार्क केला जातो? (What karat gold is hallmarked?)

आता आपण हॉलमार्किंग म्हणजे काय? (What is Hallmarking?) आणि हॉलमार्किंगची प्रक्रिया (The Hallmarking Process) कशी असते ते समजून घेतल्यानंतर, सोन्याच्या विविध कॅरेट्सची शुद्धता वेगवेगळी असते, ज्यामुळे त्यांचा वापर आणि गुणात्मकता देखील वेगळी असते. चला, तर प्रत्येक कॅरेटच्या सोन्याची शुद्धता किती आहे, हेसमजून घेऊया.

What Is Hallmarking?

 

What is the purity of 14K gold

14K सोनं – 58.3% शुद्धता आणि 41.7% मिश्रधातू असतात, ज्यामुळे ते जास्त टिकाऊ आणि मजबूत बनतं. दागिन्यांमध्ये वापरलं जातं.
14K सोन्यालाही हॉलमार्क केले जाते , पण त्याचा वापर तुलनेत कमी आहे.

What is the purity of 18K gold

18K सोनं – 75% शुद्धता आणि २५% मिश्रधातू असतात.18K सोनं दागिन्यांसाठी खूप लोकप्रिय आहे कारण ते मजबूत आणि टिकाऊ असतं.
18K सोन्याला हॉलमार्ककेले जाते.आणि भारतात याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.

What is the purity of 20K gold

20K सोनं – 83.3% शुद्धता आणि 16.7% मिश्रधातू असतात. सोनं दागिन्यांसाठी वापरलं जातं, पण भारतात त्याचा वापर कमी आहे.
20K सोन्यालाही हॉलमार्क केले जाते, पण त्याचं प्रचलन कमी आहे.

What is the purity of 22K gold

22K सोनं – 91.6% शुद्धता आणि 8.4% मिश्रधातू असतात. सोनं भारतात सर्वाधिक वापरलं जातं. हे दागिन्यांसाठी आदर्श असतं.
22K सोन्याला हॉलमार्क केले जाते,आणि याचं प्रमाण सर्वात जास्त आहे.

What is the purity of 23K gold

23K सोनं – 95.8% शुद्धता आणि 4.2% मिश्रधातू असतात.पण त्याचा वापर कमी प्रमाणात होतो.
23K सोन्यालाही हॉलमार्क केले जाते, पण त्याचा वापर कमी आहे.

What is the purity of 24K gold

24K सोनं – 99.9% शुद्धता आणि यामध्ये मिश्रधातूंचा वापर नाही, पण ते जास्त मऊ असतं. 24K सोनं म्हणजे निव्वळ सोनं, म्हणजे आपल्या सर्वसाधारण भाषेत बोलायचं झाले तर शंभर नंबरी सोनं.

24K सोन्याला हॉलमार्क केले जाते, पण दागिन्यांमध्ये फारसा वापर होत नाही. 24 कॅरेट सोन्याचा वापर बार, सिक्के बनवण्यासाठी केला जातो.कधी कधी 24 कॅरेट सोनं दुसऱ्या धातूंबरोबर गोल्ड साक्षात्कार, गोल्ड पेंटिंग किंवा आर्ट वर्क मध्ये वापरले जातं

 

सोने खरेदी करताना हॉलमार्किंग कसे तपासून पहावे? – How to Check Hallmark on Gold?

जेव्हा आपण सोनं खरेदी करतो, तेव्हा त्याची शुद्धता आणि विश्वासार्हता ही सगळ्यात महत्त्वाची बाब असते. त्यामुळे हॉलमार्क असणं गरजेचं आहे. पण, हॉलमार्क फक्त नावापुरता शिक्का नसतो – त्यामागे काही ठराविक माहिती असते, जी आपण ओळखली पाहिजे.

चला तर पाहूया, हॉलमार्किंग तपासताना नक्की कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात:

What Is Hallmarking

 

लोगो Logo
हॉलमार्क असलेल्या दागिन्यावर BIS (Bureau of Indian Standards) चा अधिकृत लोगो असतो. हा लोगो म्हणजेच सरकारने दिलेला शुद्धतेचा शिक्का. तो लोगो मुख्यत: त्रिकोण (Triangle) या आकारात असतो.

कॅरेट (Purity Mark)

दागिन्यावर सोन्याचा कॅरेट नमूद केलेला असतो, जसं की:

22K916 (म्हणजे 22 कॅरेट – 91.6% शुद्धता)

18K750 (म्हणजे 18 कॅरेट – 75% शुद्धता)

14K585 (म्हणजे 14 कॅरेट – 58.5% शुद्धता)

HUID नंबर (Hallmark Unique ID)

प्रत्येक हॉलमार्क केलेल्या दागिन्याला एक 6 अंकी किंवा अल्फा-न्यूमेरिक HUID नंबर दिला जातो. (उदा – A5P9DG ) हा नंबर यूनिक असतो आणि तो सोन्याचा दागिना BIS डेटाबेसमध्ये नोंदलेला असतो.

थोडक्यात हॉलमार्किंग तपासताना या गोष्टी बघा:
BIS चा लोगो
कॅरेट (22K916, 18K750 इ.)
HUID नंबर

BIS Care App वर HUID नंबर टाकून दागिन्याची खरी माहिती कशी मिळवायची?
(How to check jewellery HALLMARK details using HUID number in BIS Care App)

आजच्या काळात फक्त आणि दागिन्यावर हॉलमार्कचा शिक्का पाहून समाधान मानू नका. आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच खात्री करू शकता की तुमचं सोनं खरंच हॉलमार्क केलेलं आहे का?

BIS चं ‘BIS Care’ हे अ‍ॅप यासाठी खास तयार करण्यात आलं आहे. या अ‍ॅपमध्ये तुम्ही दागिन्यावर कोरलेला HUID नंबर (Hallmark Unique ID) टाकून त्याची पूर्ण माहिती मिळवू शकता.

What Is Hallmarking

कसं करायचं? 

BIS Care App मोबाईलमध्ये डाउनलोड करा.दागिन्यावर कोरलेला 6 अंकी HUID नंबर अ‍ॅपमध्ये टाका.
जर हा नंबर खरा असेल, तर अ‍ॅपवर दागिन्याची संपूर्ण माहिती दिसेल.

अ‍ॅपवर खालील माहिती बघायला मिळेल.

Hallmarking केव्हा केले आहे ती तारीख
कोणत्या Hallmarking Centre ने केली आहे – त्या सेंटरचं नाव, AHC RECOGNITION NUMBER आणि ADDRESS.
दागिना कोणत्या ज्वेलर्सने पाठवला होता – ज्वेलर्सचं नोंदणीकृत नाव,किंवा त्या ज्वेलर्सचा BIS ने दिलेला लायसन्स नंबर
तो दागिना कोणता आहे – उदा. अंगठी, चैन, झुमके वगैरे
त्याचं वजन किती आहे – अचूक ग्रॅममध्ये, पण सद्द्या दिसत नाही.
कॅरेट (14K, 18K, 22K वगैरे) – कॅरेटचे प्रमाण

जर HUID नंबर अ‍ॅपवर दिसत नसेल?

तर समजावं की तो दागिना BIS ने अधिकृतपणे हॉलमार्क केलेला नाही.
म्हणजे त्या दागिन्याचं हॉलमार्किंग खोटं/बोगस असण्याची शक्यता आहे.
अशा वेळी तुम्ही ज्वेलर्सकडे clarification मागणं गरजेचं आहे.

♠दागिन्यावर HUID नंबर आहे = हॉलमार्किंगचं फिजिकल प्रमाण
♠तोच नंबर BIS Care App वर दिसतो = हॉलमार्किंगचं डिजिटल आणि अधिकृत प्रमाण

आजच्या घडीला खऱ्या आणि बनावट हॉलमार्कमध्ये गोंधळ होऊ शकतो. पण BIS Care Appमुळे तुम्ही दागिन्याचं खरं ओळखपत्र हातातल्या मोबाईलवर पाहू शकता – तेही काही सेकंदात.

अपवाद: हॉलमार्क नसेलेले काही दागिने

नेहमी हॉलमार्क पाहूनच दागिने घ्यावे असं सांगितलं जातं, पण काही विशिष्ट प्रकारच्या दागिन्यांना हॉलमार्क असायलाच हवा असं बंधन नसतं.हॉलमार्क नसेल म्हणजे दागिना नकली आहे असं नाही, पण नियमांनुसार का नाही हे समजून घेणं ग्राहक म्हणून आपली जबाबदारी आहे

उदाहरणार्थ: २ ग्रॅम किंवा त्याहून कमी वजनाचे दागिने –
अशा दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक नाही. म्हणजेच, छोट्या वस्तूंसाठी ज्वेलरला हॉलमार्क करूनच विक्री करावी लागेल असं नाही.

काही पारंपरिक प्रकारचे किंवा विशेष हस्तकला दागिने –
ज्यावर तांत्रिकदृष्ट्या हॉलमार्किंग करणे शक्य नाही, अशा काही खास दागिन्यांनाही हॉलमार्किंगपासून सूट दिलेली असते.

BIS (भारतीय मानक ब्युरो) हि सरकारची संस्था वेळोवेळी हॉलमार्किंग संबंधीचे नियम अद्ययावत करत असते . त्यामुळे दागिने खरेदी करण्यापूर्वी  किंवा ज्वेलर बदलताना नवीन नियमांची माहिती BIS च्या अधिकृत संकेतस्थळावर  तपासावी.

ग्राहकांनी काय लक्षात ठेवावं?

हॉलमार्क पाहा, HUID तपासा आणि फक्त BIS नोंदणीकृत ज्वेलर्सकडूनच खरेदी करा.
बिलवर दागिन्याचा प्रकार, वजन, कॅरेट आणि HUID नमूद केलेलं असणं आवश्यक आहे.

what is hallmarking

हॉलमार्किंगचे फायदे – Benefits of Hallmarking

हॉलमार्किंग म्हणजे काय? (What Is Hallmarking?) आणि याचे फायदे ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

सोने खरेदी करताना “हॉलमार्क” असणं हे केवळ एक चिन्ह नसून, ग्राहकाच्या विश्वासाचं प्रमाणपत्र असतं. BIS (भारतीय मानक ब्युरो) द्वारे प्रमाणित केलेल्या हॉलमार्किंगमुळे ग्राहक आणि विक्रेता दोघांनाही काही स्पष्ट फायदे मिळतात. हे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

शुद्धतेची खात्री
हॉलमार्किंग केल्यामुळे दागिन्याच्या सोन्याची शुद्धता निश्चित असते. उदाहरणार्थ, 22K916 चा अर्थ 91.6% शुद्ध सोनं आहे. त्यामुळे तुम्ही काय खरेदी करत आहात, याबद्दल शंका राहत नाही.

विश्वासार्हता आणि पारदर्शक व्यवहार
हॉलमार्क असलेले दागिने खरेदी केल्यास, ग्राहकाला विक्रेत्यावरील विश्वास वाढतो. कारण हे दागिने BIS प्रमाणित असतात आणि त्यांच्या प्रत्येक माहितीवर सरकारी शिक्का असतो.

विक्री किंवा बदलताना अडचण येत नाही
हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचं पुन्हा विक्रीमूल्य अधिक असतं आणि ते विक्री किंवा एक्सचेंज करताना सहजतेने स्वीकारले जातात.

फसवणुकीपासून संरक्षण
हॉलमार्क नसलेल्या सोन्यात शुद्धतेबाबत फसवणुकीची शक्यता अधिक असते. हॉलमार्क असलेल्या दागिन्यांमुळे तुम्ही कमी शुद्धतेचं सोनं खरेदी करण्यापासून वाचता.

कायदेशीर संरक्षण
जर हॉलमार्क असलेल्या दागिन्यांमध्ये दोष आढळला, तर ग्राहक BIS कडे तक्रार करू शकतो आणि न्याय मिळवू शकतो. त्यामुळे ग्राहकाला कायदेशीर आधार मिळतो.

हॉलमार्किंग म्हणजे काय? (What Is Hallmarking?) यामुळे ग्राहकांना दागिन्याच्या शुद्धतेची खात्री होते आणि ते फसवणुकीपासून बचावू शकतात.

हॉलमार्क म्हणजे केवळ एक चिन्ह नव्हे, तर तुमच्या पैशाची, गुणवत्तेची आणि तुमच्या हक्कांची शाश्वती आहे. त्यामुळे सोनं घेताना हॉलमार्क आहे का, हे पहायला विसरू नका!

 

भारत सरकारचे हॉलमार्किंग संबंधीचे नियम – सोप्या भाषेत समजून घ्या

आपण जेव्हा सोनं खरेदी करतो, तेव्हा त्याची शुद्धता आणि विश्वासार्हता ही सगळ्यात महत्त्वाची बाब असते. त्यासाठी आपल्याला हॉलमार्किंग म्हणजे काय? (What Is Hallmarking?) हे समजून घेणे जितके महत्वाचे आहे, तितकेच भारत सरकारचे हॉलमार्किंग संबंधीचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. याच कारणामुळे भारत सरकारने हॉलमार्किंग ही प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य केली आहे.

हॉलमार्किंग कधीपासून बंधनकारक?

भारत सरकारने 1 जून 2021 पासून देशभरातील निवडक जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केली आहे.
म्हणजेच, जिथे BIS मान्यता प्राप्त हॉलमार्किंग केंद्र उपलब्ध आहेत, तिथे विक्रीसाठीचे सोनं हॉलमार्क केल्याशिवाय विकता येणार नाही.

BIS नोंदणी का आवश्यक आहे?

जो कोणी ज्वेलर (सोनार) दागिने विकतो, त्याच्याकडे BIS म्हणजेच Bureau of Indian Standards कडून अधिकृत नोंदणी असणं आवश्यक आहे.

ग्राहकांनी खरेदी करताना नेहमीच BIS नोंदणीकृत ज्वेलर कडूनच सोनं घेणं अधिक सुरक्षित ठरतं.

कोणत्या ज्वेलर्सना BIS नोंदणी घ्यावी लागते?

ज्या ज्वेलरची वार्षिक उलाढाल ₹40 लाखांपेक्षा जास्त असेलत्याला BIS नोंदणी बंधनकारक आहे.
ज्या ज्वेलरची उलाढाल ₹40 लाखांपेक्षा कमी असेल त्याला नोंदणी बंधनकारक नाही, पण इच्छेनुसार करू शकतात

हॉलमार्किंग केंद्र कोण सुरू करू शकतो?

हॉलमार्किंग फक्त BIS मान्यता प्राप्त केंद्रांमध्येच करता येते.

ही केंद्रे सहसा स्वतंत्र प्रयोगशाळा, संस्था किंवा कंपन्यांद्वारे चालवली जातात.

ज्वेलर्स स्वतःच्या दुकानात हॉलमार्किंग केंद्र सुरू करू शकत नाहीत, पण ते अधिकृत केंद्रांशी संपर्क साधून दागिन्यांची हॉलमार्किंग करून घेऊ शकतात.

What Is Hallmarking

ज्वेलर्ससाठी बंधनकारक असलेले 5 घटक (BIS मानदंडांनुसार)

  1. BIS चं मान्यता प्रमाणपत्र दुकानात स्पष्टपणे लावणं.- हे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. ग्राहकांना दाखवण्यासाठी हे सहज उपलब्ध असावं लागतं.
  2. दागिन्यांवर HUID असलेलेच हॉलमार्क विकणे. – BIS च्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक दागिन्यावर 6 अंकी HUID नंबर असणं आवश्यक आहे.
  3. ग्राहकांना HUID पाहता यावा यासाठी सुविधा. – (जसे की 10x लूप ग्लास) हे BIS कडून सुचवलेलं आहे. अनेक ठिकाणी हे बंधनकारक आहे ,म्हणजे ग्राहकाच्या हक्कासाठी आवश्यक आहे.
  4. BIS हॉलमार्किंगबाबत माहिती असलेला फलक दुकानात/बाहेर लावणे. – हे BIS च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रामाणिक व्यवहारासाठी आवश्यक आहे.
  5. ग्राहकांनी BIS Care App च्या माध्यमातून दागिने तपासता येतील अशी माहिती देणं. – पारदर्शकता वाढवण्यासाठी हे अलीकडील सुचना आहेत.

सोनं खरेदी करणं म्हणजे केवळ दागिना घेणं नाही, तर आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेऊन एक भावनिक आणि आर्थिक गुंतवणूक करणं आहे. त्यामुळेच सोन्याचे हॉलमार्किंग म्हणजे काय ? आणि  हॉलमार्किंग ही प्रक्रिया आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

हॉलमार्किंग म्हणजे काय? (What Is Hallmarking?) तर खात्री – BIS चं हॉलमार्क म्हणजे त्या सोन्याची सरकारमान्य शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेचा पुरावा.

HUID नंबरची पडताळणी आवश्यक – प्रत्येक दागिन्यावर असलेला HUID नंबर BIS Care App वर तपासून खात्री करणे, ही आता प्रत्येक ग्राहकाची जबाबदारी आहे.बिल न घेतल्यास नुकसान होऊ शकतं – स्पष्ट बिलाशिवाय खरेदी केल्यास नंतर समस्या येऊ शकतात.

हॉलमार्किंग म्हणजे काय? हे समजून घेताना, आजचा सोन्याचा दर जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे

म्हणून नेहमी व्यवस्थित तपशील असलेलं इनव्हॉइस घ्या.सजग ग्राहक हीच खरी शक्ती आहे – योग्य माहिती, शहाणीखुशाली आणि सजग निर्णय घेतल्यास, आपण फसवणूक टाळू शकतो आणि आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवू शकतो.

आता तुम्हाला हॉलमार्किंग म्हणजे काय?  आणि सोन्याची शुद्धता कशी ओळखावी लक्षात आले असेल अशी मी आशा करतो.

हॉलमार्किंगबद्दल अजून काही शंका असतील, तर BIS च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या. 

तुम्हाला महत्वाच्या बातम्या लगेच पाहिजेत का?
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा!


Join WhatsApp Group

1 thought on “What is Hallmarking:हॉलमार्किंग म्हणजे काय? सोन्याची शुद्धता कशी ओळखावी ते समजून घ्या”

Leave a Comment